IND vs BAN: या 2 खेळाडूंसाठी बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका अत्यंत महत्त्वाची, आता चुकी झाली तर करिअर…!
सगळ्या खेळाडूंसाठी मालिका महत्त्वाची...
मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यात परवापासून मालिका सुरु होत आहे. त्यामध्ये एकदिवसीय आणि कसोटी सामने होणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू बांगलादेशला काल रवाना झाले आहेत. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि वॉशिंग्टन हे दोन खेळाडू आज ढाका येथे दाखल होणार आहेत. टीम इंडियातील खेळाडूंसाठी सद्याची मालिका अत्यंत गरजेची आहे. कारण बीसीसीआय प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीकडे लक्ष ठेऊन आहे.
शिखर बांगलादेश दौऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार आहे, त्यामुळे त्याला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. कारण पुढच्यावर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत संधी मिळवण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. न्यूझिलंड दौऱ्यात दोन मॅचमध्ये पाऊस पडल्यामुळे एकदिवसीय मालिका न्यूझिलंड टीमने जिंकली.
टीम इंडियाचा विकेटकीपर पंतसाठी सुद्धा सध्याचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. विश्वचषक स्पर्धेत त्याला संधी देण्यात आली होती. परंतु खराब कामगिरी केल्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली. न्यूझिलंड दौऱ्यात सुद्धा त्याला चांगली खेळी करता आली नाही. पुढची विश्वचषक स्पर्धा त्याला खेळायची असल्यास चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे.
बांगलादेश विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शाहबाज अहमद, केएल राहुल, ऋषभ पंत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर. कुलदीप सेन.
बांगलादेश विरुद्ध भारतीय कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएल राहुल, ऋषभ पंत, श्रीकर भरत, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.