IND vs SA ODI Series: वनडे मालिकेला आजपासून सुरुवात, या खेळाडूंना संधी
आज दीडवाजल्यापासून क्रिकेटच्या मॅचला सुरुवात होईल.
टीम इंडिया (IND) आणि दक्षिण आफ्रिकेच्या (SA) वनडे मालिकेला (ODI Series) आजपासून सुरुवात होत आहे. आजच्या सामन्यात अनेक दिग्गज खेळाडूंना वगळण्यात आले आहे. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन या खेळाडूंचा समावेश आहे. आजच्या सामन्यात शिखर धवनला कर्णधारपद देण्यात आले आहे.
पुढच्यावर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या अनुशंगाने आत्तापासून क्रिकेटचे सामने महत्त्वाचे आहेत. आज दीडवाजल्यापासून क्रिकेटच्या मॅचला सुरुवात होईल.
आजच्या टीममध्ये अनेक ज्युनिअर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात खेळाडू कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भारत: शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, जानेमन मालन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोरखिया, वेन पारनेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन प्रिटोरियस रबाडा, तबरेझ रबाडा शम्सी