ओजल नलवडीचे ब्लाइंड फोल्ड रोलर स्केटिंगमध्ये 13 विक्रम, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद
ओजल सुनील नलवडी (Ojal Nalavadi) या मुलीने ब्लाइंड फोल्ड रोलर स्केटिंगमध्ये 400 मीटरचें अंतर कमी वेळात पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. Ojal Nalavadi skating video shared by Gunniess World Records
बंगळुरू : कर्नाटकच्या ओजल सुनील नलवडी (Ojal Nalavadi) या मुलीने ब्लाइंड फोल्ड रोलर स्केटिंगमध्ये 400 मीटरचें अंतर कमी वेळात पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. ओजलच्या या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली आहे. केवळ 12 वर्ष वय असताना ओजलनं 13 विक्रम प्रस्थापित केले आहेत. ओजल नलवडीच्या विक्रमांची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्डससमध्ये आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झालीय. ओजलच्या स्केटिंगचा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने शेअर केला आहे. (Ojal Nalavadi skating video shared by Gunniess World Records )
कर्नाटकमधील हुबळी शहरातील ओजल नलवडीला रोलर स्केटिंग की ट्रेनिंग कोच अक्षय सुर्यवंशी यांच्याकडून प्रशिक्षण मिळाले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये भाग घेण्यापूर्वी ओजलने 2 वर्ष शिरुर पार्कमध्ये सराव केला.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ओजल नलवडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ओजल नलवडी हिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने 400 मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी 1 तासाचा कालावधी दिला होता. ओजलने हे अंतर 51.25 सेंकदात पूर्ण केले.
ओजल सुनील नलवडी चा व्हिडीओ guinnessworldrecords ने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेज पर 28 ऑक्टोबरला शेअर केला आहे. ” सर्वात वेगवान ब्लाइंड फोल्ड रोलर स्केटिंग करणाऱ्या मुलीने 400 मीटरचं अंतर फक्त 51.25 सेकंदात पूर्ण केले”, असं कॅप्शन लिहलं आहे.ओजलच्या या व्हिडीओला 28 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ओजलच्या कामगिरीबद्दल अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ओजलने हा विक्रमा मागली वर्षी बालदिनाच्या दिवशी केला होता. ती हुबळी शहरात शिक्षण घेत आहे. ओजलची कामगिरी पाहण्यासाठी शेकडो लोक उपस्थित राहिले होते.
संबंधित बातम्या :
IPL 2020, CSK vs KXIP Live : चेन्नई सुपर किंग्जसचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय
IPL 2020 : रोहित शर्माच्या कमबॅकबाबत कायरन पोलार्डचं मोठं वक्तव्य
(Ojal Nalavadi skating video shared by Gunniess World Records )