तुमच्या मोबाईलचं सोनं होणार, ई-कचऱ्यापासून ऑलिम्पिक पदकं बनणार!

नवी दिल्ली : तुमचा मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅझेट खराब झालं असेल, तर त्याचं आता सोनं होणार आहे. कारण तुमची खराब झालेली वस्तू आता वाया जाणार नाही. ऑलिम्पिकमध्ये विजेत्या खेळाडूंच्या गळ्यात अभिमानाने चमकणारी पदकं, आता ई-वेस्टपासून बनवली जाणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचं आयोजन जपानची राजधानी टोकियो इथे होणार आहे. […]

तुमच्या मोबाईलचं सोनं होणार, ई-कचऱ्यापासून ऑलिम्पिक पदकं बनणार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

नवी दिल्ली : तुमचा मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅझेट खराब झालं असेल, तर त्याचं आता सोनं होणार आहे. कारण तुमची खराब झालेली वस्तू आता वाया जाणार नाही. ऑलिम्पिकमध्ये विजेत्या खेळाडूंच्या गळ्यात अभिमानाने चमकणारी पदकं, आता ई-वेस्टपासून बनवली जाणार आहेत.

पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचं आयोजन जपानची राजधानी टोकियो इथे होणार आहे. टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे जपानने त्यापूर्वीच पर्यावरणपूरक निर्णय घेतला आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना देण्यात येणारी पदकं ही ई-कचऱ्यापासून तयार करणाऱ्यात येणार आहे.

टोकियो ऑलिम्पिक 2020 खेळांमधील सर्व पदकं ही इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून मिळणाऱ्या धातूंपासून तयार करण्यात येणार आहेत. आयोजकांनी शुक्रवारी याची घोषणा केली. टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजन समितीने 2017 मध्ये नागरिकांकडून जुने स्मार्टफोन्स, लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक कचरा जमवण्याची योजना लाँच केली होती. या योजनेचा हेतू टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेतील पदकांसाठी धातू जमा करणे होता. जपानी व्यवसाय आणि उद्योगाच्या माध्यमातून या ई-कचऱ्याची पुननिर्मिती अर्थात रिसाकल करुन धातू एकत्र करण्यात आले आहेत.

याबाबत आयोजकांनी सांगितले की, “जितक्या प्रमाणात आम्ही धातू एकत्रित केला आहे, त्याने पदकं बनवण्याचे आमचे लक्ष पूर्ण होईल. ही संपूर्ण प्रक्रिया मार्चच्या अखेरीस पूर्ण होईल.”

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये जपान महापालिकेच्या आधिकाऱ्यांनी 47 हजार 488 टन ई-कचरा जमा केला होता. यामध्ये नागरिकांनी वापरलेल्या 50 लाख मोबाईल्सचा समावेश होता.

ऑलिम्पिक पदकं बनवण्यासाठी पहिल्यांदाज ई-कचऱ्याचा वापर करण्यात येत आहे असं नाही. तर याआधीही रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकं बनवण्यासाठी वापरण्यात आलेली 30 टक्के चांदी आणि कांस्य ई-कचऱ्यातूनच मिळवण्यात आले होते.

VIDEO : 

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.