Maiden Over | बापू नाडकर्णींकडून सलग 21 ओव्हर मेडन, सर्वाधिक मेडन टाकणारा गोलंदाज कोण?

या गोंलदाजाने एकूण 37 कसोटी सामने खेळले आहेत.

Maiden Over | बापू नाडकर्णींकडून सलग 21 ओव्हर मेडन, सर्वाधिक मेडन टाकणारा गोलंदाज कोण?
या गोंलदाजाने एकूण 37 कसोटी सामने खेळले आहेत.
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 2:57 PM

मुंबई : क्रिकेटमध्ये दररोज अनेक विक्रम रचले जातात. तसेच रेकॉर्ड ब्रेकही केले जातात. मात्र काही रेकॉर्डस हे वर्षोंवर्ष कायम राहतात. कसोटी क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा रेकॉर्ड मराठमोळ्या बापू नाडकर्णी यांच्या नावावर आहे. त्यांनी एका डावात 21 ओव्हर मेडन टाकण्याचा विश्वविक्रम केला होता. पण या व्यतिरिक्त एक असाही गोलंदाज होऊन गेलाय, ज्यांनी एका कसोटीत सलग (दोन्ही डावात) सलग 137 चेंडू निर्धाव टाकण्याची कामगिरी केली आहे. तसेच संपूर्ण सामन्यात त्यांनी एकूण 31 ओव्हर्स निर्धाव टाकण्याची कामगिरी केली आहे. ही गोष्ट आहे दक्षिण आफ्रिकेच्या ह्यूज जोसेफ टायफील्‍ड (Hugh Joseph Tayfield) यांची. या घटनेला आज एकूण 64 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने याबद्दल जाणून घेणार आहोत. (on this day 26 january 1957 south africa bowler Hugh Joseph Tayfield achivment 137 dot delivery against england)

इंग्लंडचा संघ आफ्रिका दौऱ्यावर होता. या दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीत टायफील्‍ड यांनी ही कामगिरी केली होती. त्यांनी पहिल्या डावात एकही रन न देता सलग 119 चेंडू निर्धाव टाकले होते. तर दुसऱ्या डावातील पहिल्या 3 ओव्हर (18 चेंडू) मध्ये धावा दिल्या नव्हत्या. अशा प्रकारे टायफील्‍ड यांनी एकूण या सामन्यातील दोन्ही डावात सलग 137 चेंडू (22. 5) ओव्हर निर्धाव टाकण्याचा पराक्रम केला.

उल्लेखनीय कामगिरी

टायफिल्ड त्यांच्या काळातील सर्वश्रेष्ठ ऑफ स्पिनर्सपैकी एक होते. टायफिल्ड आफ्रिकेकडून वेगवान 100 विकेट्स घेणारे पहिले गोलंदाज होते. क्रिकेटमधील बहूमुल्य योगदानासाठी 1956 मध्ये ‘विस्डन क्रिकेटर ऑफ द ईयर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

कसोटी कारकिर्द

टायफिल्ड यांनी एकूण 37 कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधत्व केलं. यामध्ये त्यांनी 170 विकेट्स घेतल्या. 113 धावा देऊन 9 विकेट्स ही त्यांची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी आहे. टायफिल्ड यांनी एका डावात 14 वेळा 5 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या. तर एका सामन्यात 2 पेक्षा जास्त वेळा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तसेच त्यांनी एकूण 187 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 864 विकेट्स मिळवल्या.

बापू नाडकर्णी

कसोटी क्रिकेटमध्ये सलग 21 ओव्हर मेडन टाकण्याचा विश्वविक्रम बापू नाडकर्णी यांच्या नावावर आहे. नाडकर्णी यांनी इंग्लंडविरोधात ही कामगिरी केली होती. या सामन्यात नाडकर्णी यांनी 32 ओव्हर टाकल्या होत्या. या पैकी 21 षटक या मेडन ओव्हर होत्या. विशेष म्हणजे 32 षटकात त्यांनी केवळ पाच धावा दिल्या होत्या.

संबंधित बातम्या :

IPL Retained and Released Players 2021 : लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले?

माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे निधन

(on this day 26 january 1957 south africa bowler Hugh Joseph Tayfield achivment 137 dot delivery against england)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.