54th Asian Bodybuilding Championships : आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा, पहिल्याच दिवशी भारताला चार सुवर्ण, बारा पदकांची कमाई
नवी मुंबईच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर सुभाष पुजारी यांनी अभिमानास्पद कामगिरी करताना मास्टर्स शरीरसौष्ठवाच्या गटात 'आशिया श्री'चा बहुमान पटकावून इतिहास रचलाय. त्यांचंही सर्वत्र आता कौतुक होतंय.
मालदीव : काल मालदीवच्या माफुशी बेटावर सुरू असलेल्या 54व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या (54th Asian Bodybuilding Championships) पहिल्या दिवशी भारतानं तब्बल चार सुवर्णपदकांची (Gold medal) कमाई केली. हे घवघवीत यश मिळाल्याननं चहुकडे भारताचं (India) आणि भारतीय खेळाडूंचं कौतुक होतंय. भारताच्या खेळाडूंनी चार सुवर्ण दकांची मोठी कमाई केल्यानं हे भारतासाठी मोठं यश मानलं जातंय. मालदीवमधल्या स्पर्धेतील कालचा क्षण अद्भूत होता. यावेळी भारताच्या विजयानं अर्ध्या अर्ध्या तासाच्या फरकानं ‘जन गण मन’चे सूर ऐकू येत होते. या स्पर्धेत नवी मुंबईच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर सुभाष पुजारी यांनी अभिमानास्पद कामगिरी करताना मास्टर्स शरीरसौष्ठवाच्या गटात ‘आशिया श्री’चा बहुमान पटकावून इतिहास रचलाय. त्यांचंही कौतुक होतंय. तर दिव्यांगाच्या गटामध्ये के. सुरेश, ज्यूनियर गटात (75 किलो) सुरेश बालाकुमार, स्पोर्टस् फिजीक प्रकारात अथुल कृष्णा यांनी सोनेरी यश संपादले. भारतासाठी हे मोठं यश आहे.
स्पर्धेचा निकाल
- दिव्यांग शरीरसौष्ठव : 1.के. सुरेश (भारत), 2. लोकेश कुमार (भारत), 3. मुकेश मीना (भारत).
- पुरूष फिटनेस फिजीक (170 सेमी) : 1. वानचाइ कंजानापायमाइन (थायलंड), 2.त्रानहोआंगडुय थुआन (व्हिएतनाम), 3. राजू राय (भारत), 4. आरंभम मंगल (भारत).
- पुरूष फिटनेस फिजीक (170 सेमीवरील) :1. दमरोंगसाक सोयसरी (थायलंड) 2. नत्तावत फोचत (थायलंड), 3. तेनझिंग चोपल भुतिया (भारत), 4. मोर्तझा बेफिक्र (इराण), 5.कार्तिक राजा (भारत).
- ज्यू. पुरूष शरीरसौष्ठव (75 किलो) : 1. के तुएन (व्हिएतनाम), 2. मंजू कृष्णन (भारत), 3. मुस्तफा अलसईदी (इराक), 4. कुमंथेम सुशीलकुमार सिंग (भारत), 5. ताकेरू कावामुरा (जपान).
- ज्यू. पुरूष शरीरसौष्ठव (75 किलोवरील) : 1. सुरेश बालाकुमार (भारत), 2. उमर शहझाद (पाकिस्तान), 3. चिंगखेईनगानबा अथोकपम (भारत).
- पुरूष स्पोर्टस् फिजीक (170 सेमी) : 1. अझनीन राशद (मालदीव), 2.युवराज जाधव (भारत), 3. अरसलान बेग (पाकिस्तान), 4. आरंभम मंगल (भारत), 5.मुदस्सर खान (पाकिस्तान).
- पुरूष स्पोर्टस् फिजीक (175 सेमी) : 1. अथुल कृष्णा (भारत), 2.महदी खोसरवी (इराण), 3. थेपहोर्न फुआंगथापथिम (थायलंड), 4. सचिन चौहान (भारत), 5.अली सलीम इब्राहिम (मालदीव).
- पुरूष स्पोर्टस् फिजीक (180 सेमी) : 1. बायत येर्कयेबुलान (मंगोलिया), 2.प्रकासित कृआबत (थायलंड), 3. मोहसेन मोन्सेफ नवेखी (इराण), 4. स्वराज सिंग (भारत), 5. शिनु चोव्वा (भारत).
- पुरूष स्पोर्टस् फिजीक (180 सेमीवरील) : 1. अलीरेझा अलावीनेझाद (इराण), 2. अंबरीश के.जी. (भारत), मोहम्मद इमराह (मालदीव).
स्पोर्टस् फिजीकच्या 175 सेमी उंचीच्या गटात अथुल कृष्णानं इराणच्या महदी खोसरामवर मात केली. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. स्पोर्टस् फिजीकच्या 170 सेमीच्या गटात युवराज जाधवचं पदक हुकलं. मालदीवच्या अझनीन राशद अनपेक्षितपणे अव्वल ठरला. ज्यूनियर गटाच्या 75 किलोवरील वजनी गटात सुरेश बालाकुमारने बाजी मारली. भारताच्या अंबरीश केजी, मनु कृष्णन यांनीही रौप्य पदके पटकावली.