सानिया मिर्झाच्या आयुष्यात पुन्हा एकदा नव्या घडामोडींची चर्चा, झालं असं की..

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा या ना त्या कारणाने कायम चर्चेत असते. सानिया मिर्झाचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडलं की चर्चा होत असते. आता सानिया मिर्झाची इन्स्टाग्राम पोस्ट असंच काहीसं सांगत आहे.

सानिया मिर्झाच्या आयुष्यात पुन्हा एकदा नव्या घडामोडींची चर्चा, झालं असं की..
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 3:01 PM

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी 2010 मध्ये निकाह केला होता. या लग्नाची दोन्ही देशांमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. दोघांची सुखी संसार 12 वर्षे चालला. मात्र अचानक 2022 मध्ये या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी निकाह केला. शोएब मलिकने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यामुळे सानियाच्या आयुष्याची चिंता तिच्या चाहत्यांना लागून होती. मध्यंतरी तिच्या आयुष्यात कोणीतरी असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र या सर्व अफवा असल्याचं सिद्ध झालं आहे. सानिया मिर्झा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सुविचार शेअर करत आपल्या आयुष्याबाबत हिंट देत असते. यावरून तिचे चाहते तिच्या आयुष्यातील घडामोडींचा अंदाज घेत असतात. सानिया मिर्झाने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी घडल्याचं अंदाज व्यक्त केला जात आहे.

सानिया मिर्झाने इंस्टाग्राम पोस्ट करत लिहिलं होतं की, ‘sabr patince, just when you think its over allah send you a miracle’ याचा अर्थ असा की, धीर धरा, जेव्हा तुम्हाला वाटते की सर्वकाही संपले आहे, तेव्हा अल्लाह तुम्हाला काहीतरी पाठवतो जे चमत्कारासारखे आहे. सानिया मिर्झाच्या या पोस्ट अर्थ स्पष्ट नसला तरी यातून काहीतरी सांगत असल्याचं अंदाज तिच्या चाहत्यांनी बांधला आहे.

सानियाच्या आयुष्यातील चमत्कार एखादी व्यक्ती असू शकते, असं तिच्या चाहत्यांना वाटत आहे. कारण भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या सिंगल आहे. शोएब मलिकपासून दूर गेल्यानंतर ती तिचं आयुष्य एकाकी जगत आहे. सानियाच्या कुटुंबियांनीही या वर्षाच्या सुरुवातीलाच शोएब मलिकशी कोणताच संबंध नसल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान सानिया मिर्झाने सांगितले होते की, निवृत्तीनंतर तिला तिच्या मुलासोबत वेळ घालवायचा होता. जे मी आता करतो आणि मला ते करायला आवडते.मी अजूनही काम करते, माझी हैदराबादमध्ये टेनिस अकादमी आहे.मी मुद्दाम स्वतःला जास्त व्यस्त ठेवत नाही कारण मला माझ्या मुलासोबत काही वेळ घालवायचा आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.