आमीर खान याला वाटलं होतं त्या रात्री मुलं अनाथ होणार, स्वत: सांगितली भयान रात्रीची गोष्ट!
आपल्या तिन्ही मुलांना माझ्याशिवाय मोठं व्हावं लागेल. तसंच पत्नीला एकटीला मुलांना वाढवावं लागेल, नेमकं काय घडलं खेळाडूसोबत त्या रात्री!
Follow us
ब्रिटनचा प्रोफेशनल बॉक्सर आमिर खान घडलेल्या दरोड्याच्या घटनेतून अजूनही सावरलेला नाहीये. मागील वर्षी लंडनमध्ये आमिरला बंदुकीच्या धाक दाखवत त्याची लुट करण्यात आली होती. तो भयंकर दिवस आणि ती वेळअद्यापही हा बॉक्सर विसरलेला नाहीये. या घटनेदरम्यान त्याची पत्नीही त्याच्यासोबत होती.
या घटनेच्या वर्षभरानंतर आमिरने एका मुलाखतीत सांगितलं की, मला त्या दिवशी असं वाटलं होतं की मी मरणार. कारण आयुष्यात पहिल्यांदाच मी बंदूक पाहिली होती. त्या दरोडेखोरांना घड्याळ दिल्यानंतर मी तोंड दुसरीकडे वळवले होते कारण मला गोळी आपल्या दिशेने येताना पाहायची नव्हती.
आपल्या तिन्ही मुलांना माझ्याशिवाय मोठं व्हावं लागेल. तसंच फरयालला (आमिरची पत्नी) एकटीला मुलांना वाढवावं लागेल, असं त्यावेळी आमिरला वाटत होतं. दरोड्याच्या वेळी तो फक्त मुलांचाच विचार करत होता. पाकिस्तानशी संबंध असलेल्या बॉक्सर आमिरला तीन मुले आहेत. त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे.
पुढे आमिरनं सांगितलं की, जेव्हा दरोडेखोर मला लुटत होते तेव्हा मी कारमध्ये पाहिलं. पण कारमध्ये माझी पत्नी फरयाल नव्हती. ती रस्त्यात लोकांकडे मदत मागत होती. आमिरला सुरुवातीला हा विनोद वाटला होता. पण दरोडेखोराने बंदूक दाखवताच त्याला खरं वाटलं.
आमिरच्या चोरीला गेलेल्या घड्याळाची किंमत 73 लाख रूपये होती. तो 10 वर्षांपासून त्या घड्याळ्याचा प्रीमियर भरत होता. तसंच या घटनेनंतर आमिर लंडनमध्ये क्वचितच राहतो. तो आता आपल्या कुटुंबासह दुबईमध्ये राहतोय.