Asian Bodybuilding Competition : भारताच्या डॉली सैनीनं जिंकलं सुवर्णपदक, मुंबईच्या मंजिरी भावसारला कांस्य
भारताच्या पुरूष खेळाडूंनी 4 सुवर्णांसह एकूण 12 पदके जिंकली होती. आता एकूण 5 सुवर्णांसह 17 पदके भारतानं आपल्या खात्यात जमा केली आहे. स्पर्धेच्या महिला गटाच्या सर्व लढती निसर्गरम्य क्रॉसरोड बेटावर झाल्या.
मालदीव : मालदीवमध्ये (Maldives) 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत (Asian Bodybuilding Competition) भारतीय (Indian) खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करताना दिसून येताय. पुरुष खेळाडूंच्या बरोबरीनं भारताच्या महिला खेळाडूंनी देखील चमकदार कामगिरी केली आहे. स्पर्धेत दुसऱ्या दिवशी मंगळवारी भारताच्या महिला खेळाडूंनी 1 सुवर्ण आणि 4 कांस्यपदके जिंकली आहेत. या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. भारतात या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. पहिल्या दमदार कामगिरी करत भारताच्या पुरूष खेळाडूंनी 4 सुवर्णांसह एकूण 12 पदके जिंकली होती. आता एकूण 5 सुवर्णांसह 17 पदके भारतानं आपल्या खात्यात जमा केली आहे. स्पर्धेच्या महिला गटाच्या सर्व लढती निसर्गरम्य क्रॉसरोड बेटावर झाल्या. भारतीय या खेळाडूंच्या कामगिरीनं इतर देशातील खेळाडू देखील भारावून गेले आहेत.
महिला खेळाडूंचे वर्चस्व
स्पर्धेत महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत 55 किलो वजनी गटात डॉली सैनीने सुवर्णपदक पटकावत सर्वाचे लक्ष्य वेधले. या गटात आतापर्यंत यजमसान थायलंड, मंगोलिया आणि व्हिएतनामच्या महिला खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. या देशांच्या अव्वल खेळाडूंना भारताच्या महिलांनी जोरदार टक्कर दिली. भारताच्या डॉली सैनीने थायलंडमध्ये पहिला क्रमांक पटकावत तिरंगा फडकावला.
डॉ. मंजिरी भावसारला कांस्यपदक
स्पर्धेत वरिष्ठ महिलांच्या 155 सेमी उंचीच्या मॉडेल फिजीक प्रकारात भारताच्या डॉ. मंजिरी भावसारने कांस्यपदक जिंकून आपले आंतरराष्ट्रीय पदाकचे स्वप्न पुर्ण केले. मंजिरी डॉक्टर आहे. आवड म्हणून शरीरसौष्ठव स्पर्धेत देखील तिने नवी उंची गाठली आहे. या गटात मंगोलियाच्या बदामखंडने सुवर्ण आणि थायलंडच्या किरीटिया चंतारतने रौप्यपदक मिळवले. त्याचबरोबर, गटात मुंबईची निशरीन पारीख पाचव्या स्थानी राहिली.
अव्वल 5 मध्ये भारताच्या तीन खेळाडू
ज्यूनियर महिलांच्या मॉडेल फिजीक प्रकारात भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या गटात अव्वल 5 मध्ये भारताच्या तीन खेळाडूंनी स्थान मिळवले. मंगोलियाच्या मुंगुनशगाई हिने सुवर्णपदक जिंकले. भारताच्या सोलिमला जाजोला रौप्य तर भाविका प्रधानला कांस्य मिळाले. चौथा क्रमांकही भारताच्याच सोलन जाजोने मिळविला.
थायलंडच्या महिलांचा दबदबा
महिलांच्या गटात पूर्णपणे यजमान थायलंडच्या महिला खेळाडूंचा दबदबा राहिला. त्यांनी महिलांच्या 21 गटांपैकी 5 गटात सुवर्ण आणि 2 रौप्य जिंकत सर्वाधिक 630 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकावले. व्हिएतनामने चार सुवर्णांसह 485 गुण मिळवत उपविजेतेपद आणि मंगोलियाने तीन सुवर्ण जिंकत 440 गुणांसह तिसरा क्रमांक राखला.
दमदार कामगिरी करत भारताच्या पुरूष खेळाडूंनी 4 सुवर्णांसह एकूण 12 पदके जिंकली होती. आता एकूण 5 सुवर्णांसह 17 पदके भारतानं आपल्या खात्यात जमा केली आहे. स्पर्धेच्या महिला गटाच्या सर्व लढती निसर्गरम्य क्रॉसरोड बेटावर झाल्या.