Asian Champions Trophy 2024 : भारत चीन यांच्यात जेतेपदासाठी लढत, पाकिस्तानचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि चीन यांच्यात लढत होणार आहे. उपांत्य फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेला, तर चीनने पाकिस्तानला पराभूत केलं. आता 17 सप्टेंबरला दोन्ही संघ भिडणार आहेत.
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि चीन यांच्यात सामना होणार आहे. भारताने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा 4-1 ने धुव्वा उडवला. दुसरीकडे, पाकिस्तान आणि चीन यांच्यातील उपांत्य फेरीची लढत अतितटीची झाली. सामना बरोबरीत सुटल्याने निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये चीनचा संघ वरचढ ठरला. पेनल्टी शूटआऊटमध्ये चीनने 2-0 ने आघाडी घेत विजय मिळवला. चीनचा गोलकीपर कैयू वांगने शूटआऊटमध्ये क्लीन स्लेट राखण्याच्या प्रयत्नात उत्कृष्ट कामगिरी केली, तर चीनकडून बेनहाई चेन आणि चानलियांग लिन यांनी गोल केले.स्पर्धेच्या इतिहासात चीनच्या राष्ट्रीय संघाने जेतेपदाच्या फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानचा संघ कांस्य पदकासाठी दक्षिण कोरियाविरुद्ध खेळेल.
चीन पाकिस्तान यांच्या सामन्यातील पहिल्या सत्रात 0-0 अशी स्थिती होती. पण दुसऱ्या सत्रात चीनने आक्रमकता दाखवली आणि आघाडी घेतली. सामन्यात 18व्या मिनिटाला युआनलिन लूने चीनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. दुसऱ्या सत्रात पाकिस्तानला गोल करण्यापासून रोखण्यासाठी चीननेही शानदार बचाव केला. तिसऱ्या सत्रात पाकिस्तानने बरोबरी साधली, पण ही स्थिती शेवटपर्यंत कायम राहिली. चीनने पेनल्टी शूटआऊटमध्ये पाकिस्तानला संधी दिली आणि 2-0 ने विजय मिळवला. आता भारत आणि चीन यांच्यात अंतिम फेरीची लढत होणार आहे. भारताने सहाव्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
पाकिस्तानने साखळी फेरीत चीनचा 5-1 ने धुव्वा उडवला होता. पण उपांत्य फेरीत सर्वकाही फेल गेलं. सामना बरोबरीत सुटला असताना पेनल्टी शूटआऊटमध्ये चीन वरचढ ठरला. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याचं पाकिस्तानचं स्वप्न भंगलं आहे. पाकिस्तानने साखळी फेरीतील पाच सामन्यापैकी 2 सामन्यात विजय, 2 सामने बरोबरीत आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं होतं. मलेशिया विरुद्धचा सामना 2-2 ने बरोबरीत, दक्षिण कोरियाविरुद्धचा सामना 2-2 ने बरोबरीत, जापानविरुद्धचा सामना 2-1 जिंकला, चीनविरुद्धचा सामना 5-1 ने जिंकला आणि भारताविरूद्धचा सामना 1-2 ने गमवला होता.
दोन्ही संघाचे खेळाडू
चीन : आओ वेइबाओ, आओ यांग, चाओ जीमिंग, चेन बेनहाई, चेन चोंगकाँग, चेन किजुन (कर्णधार), डेंग जिंगवेन, ई कैमिन, ई वेनहुई, गाओ जिशेंग, हे योंगुआ, हुआंग झियांग, लिन चांगलियांग, लु युआनलिन, मेंग दिहाओ मेंग नान, वांग कैयू (गोल कीपर), वांग वेइहाओ (गोल कीपर), झांग ताओझू, झू झियाओटोंग.
पाकिस्तान : अब्दुल रहमान, अहमद अजाज, अली गझनफर, बट अम्माद (कर्णधार), हम्मादुद्दीन मुहम्मद, हयात जिक्रिया, खान अब्दुल्ला इश्तियाक (गोलकीपर), खान सुफियान, लियाकत अर्शद, महमूद अबू, नदीम अहमद, कादिर फैसल, राणा वाहीद अश्रफ, रज्जाक सलमान, रुमन, शाहिद हन्नान, शकील मोईन, उर-रहमान मुनीब (गोलरक्षक).