Asian Champions Trophy : भारताचा सलग पाचवा विजय, पाकिस्तानने पहिला गोल केला पण…
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने सलग पाचवा विजय मिळवला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला 2-1 ने लोळवलं आणि विजय नोंदवला. कर्णधार हरमनप्रीत सिंहने या सामन्यात दोन गोल मारले.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारताची विजयी घोडदौड सुरुच आहे. एशियन चॅम्पियन्स स्पर्धेत भारताने एक एक करत सलग पाच सामने जिंकले आहेत. पाचव्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असेल्या पाकिस्तानला पराभूत केलं. साखळी फेरीतील हा शेवटचा सामना होता. या सामन्यात पाकिस्तानला 2-1 ने पराभूत केलं. आता भारताची थेट लढत उपांत्य फेरीत होणार आहे. खरं तर या सामन्यात पाकिस्तानने आघाडी घेतली होती. पण आत्मविश्वासाने भरलेल्या भारतीय संघाला पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही. कर्णधार हरमनप्रीत सिंहने दोन गोल मारत पाकिस्तानचे हिशेब चुकता केला. पेनल्टी कॉर्नरचं रुपांतर दोन गोलमध्ये केलं. तसेच हा सामना 2-1 ने जिंकला. पाकिस्तानने या सामन्यात पहिल्या सत्रापासूनच आक्रमक सुरुवात केली होती. सातव्या मिनिटाला गोल केला आणि आघाडी घेतली. त्यामुळे भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं होतं. पण भारताने अवघ्या काही मिनिटातचं कमबॅक केलं. पहिलं सत्र संपण्यासाठी दोन मिनिटं शिल्लक असताना गोल केला आणि 1-1 बरोबरी साधली.
दुसऱ्या सत्रापासून भारताने आपलं वर्चस्व कायम ठेवलं. 19 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार हरमनप्रीत सिंहने संधीचं सोनं केलं. त्यामुळे भारताला 2-1 अशी आघाडी घेतील. तिसऱ्या सत्रातही भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण ही संधी हुकली. हरमनप्रीत कौरल हा गोल करता आला नाही. दुसरीकडे, पाकिस्तानलाही संधी मिळाल्या. पण त्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही. दरम्यान, पाकिस्तानच्या अबु महमूदचा पाय मुरगळला आणि गंभीर जखमी झाला. त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावं लागलं.
भारत पाकिस्तान सामना आणि त्यात द्वंद्व होणार नाही असं कसं होईल. या सामन्यात दोन्ही बाजूच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच काय तर दोन्ही बाजूचे खेळाडू भिडले. सामना काहीही करून जिंकण्यासाठी धडपड सुरु होती आणि त्यातून वादाला संधी मिळत होती. यामुळे वाद थांबवण्यासाठी पंचांनी पिवळ्या कार्डचा वार केला. पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना सस्पेंड केलं, तर भारताच्या एका खेळाडूवर कारवाई करण्यात आली.