एशियन चॅम्पियन्स स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत चीन आमनेसामने, कधी आणि कुठे पाहता येईल सामना? जाणून घ्या

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेचा अंतिम सामना मंगळवारी होत आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि चीन आमनेसामने येत आहेत. चला जाणून घेऊयात हा सामना नेमका कधी आणि कुठे पाहता येईल.

एशियन चॅम्पियन्स स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत चीन आमनेसामने, कधी आणि कुठे पाहता येईल सामना? जाणून घ्या
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 10:26 PM

एशियन चॅम्पियन्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने सहाव्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा एन्ट्री मारली आहे. यावेळी भारताचा सामना यजमानपद भूषविणाऱ्या चीनशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींची नजर आहे. साखळी फेरीत भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. पाच पैकी पाच सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. तसेच उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला 4-1 ने पराभवाचं पाणी पाजलं. दुसरीकडे, चीनने पाकिस्तानचा पेनल्टी शूटआऊटमध्ये धुव्वा उडवला आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 1-1 बरोबरीत सुटला होता. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटमध्ये निकाल गेला. चीनने पाकिस्तानला 2-0 ने पराभूत केलं आणि अंतिम फेरीत धडक मारली. चीनचा संघ अंतिम फेरीत पहिल्यांदाच खेळत आहे. तर चीनने आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. भारताने साखळी फेरीत चीनचा 3-0 ने पराभव केला होता. भारताने एकही सामना न गमवता अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.

भारत आणि चीन यांच्यात अंतिम फेरीचा सामना कुठे आणि कधी होणार आहे?

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेत भारत आणि चीन यांच्यातील अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. हा साना चीनच्या हुलुनबुइर येथे होणार आहे.

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट आणि लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि केव्हा असेल?

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेत भारत आणि चीन यांच्यातील अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी सुरु होईल. लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या सोनी स्पोर्ट टेन 1 आणि टेन 1 एचडी चॅनेलवर असले. तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग सोनीलिव एप आणि वेबसाईटवर मोफत असेल.

भारतीय हॉकी संघ : कृष्ण बहादूर (गोलकीपर),सूरज कर्केरा (गोलकीपर), हरमनप्रीत सिंह (कर्णधार/डिफेंडर्स), जरमनप्रीत सिंग (डिफेंडर्स), जगराज सिंग, संजय, सुमित, अमित रोहिदास, विवेक सागर प्रसाद (उपकर्णधार), मनप्रीत सिंग, मोहम्मद राशील मूसिन, राज कुमार पाल,नीलकांत शर्मा, अभिषेक, सुखजीत सिंह, ओरजीत सिंह हुंडल, उत्तम सिंग, गुरजोत सिंग.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.