एशियन चॅम्पियन ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघाची कमाल, चीनला नमवून रचला इतिहास
भारतीय महिला हॉकी संघाने एशियन चॅम्पियन ट्रॉफी हॉकी स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आहे. अंतिम सामन्यात चीनला 1-0 ने नमवून जेतेपद मिळवलं आहे. या सामन्यात चेंडू जास्तीत जास्त वेळ भारतीय संघाच्या ताब्यात होता. त्यामुळे संपूर्ण सामन्यात भारताची पकड दिसली.
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली आहे. बिहारच्या राजगीरमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत भारताने तिरंगा फडकावला आहे. सलीमा टेटेच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत दबदबा कायम ठेवला आहे. चीनला तिसऱ्यांदा पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं आहे. भारताने यापूर्वी 2016 आणि 2023 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. या विजयासह भारताने दक्षिण कोरियाची बरोबरी केली आहे. दक्षिण कोरियाने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा तीन वेळा जेतेपद मिळवलं आहे. अंतिम सामन्यात भारताने चीनला 1-0 ने पराभूत केलं. या सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय संघ चीनवर हावी झाला होता. जास्तीत जास्त वेळ भारतीय संघाने आपल्या ताब्यात चेंडू ठेवला होता. दुसरीकडे, भारताने एक गोल केल्यानंतर चीन बरोबरी साधण्यासाठी खूपच धडपड करावी लागली. पण चीनचा एकही खेळाडू गोल करू शकला नाही. भारताकडून दीपिकाने एकमेव गोल केला.
भारताने उपांत्य फेरीत जापानला पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती. भारताने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेत भारताने एकूण 5 सामने खेळले. या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवला. म्हणजेच जेतेपदापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.चीनने या स्पर्धेत एकूण पाच सामने खेळले. त्यापैकी फक्त अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.भारतीय संघाने तीन वेळा, दक्षिण कोरियाने 3 आणि जापानने 2 वेळा जेतेपद जिंकलं आहे.
🏆 Champions Again! 🇮🇳🔥
Team India clinches the Bihar Women’s Asian Champions Trophy Rajgir 2024 title with a stellar 1-0 victory over China! 🎉💪 The defending champions have shown their grit, skill, and determination, proving once again why they are on top of Asia.
Another… pic.twitter.com/RkCxRI2Pr2
— Hockey India (@TheHockeyIndia) November 20, 2024
अंतिम फेरीतील पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. तर दुसऱ्या हाफच्या पहिल्या मिनिटात भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या पेनल्टी कॉर्नरचा फायदा दीपिकाने घेतला. कॉर्नरचा पहिला फटका चुकला आणि चेंडू सर्कलमध्येच होता. तेव्हा नवनीतच्या स्टिकला चेंडू डिफ्लेक्ट होत दीपिकाकडे पोहोचला आणि तिने फ्लिक करत गोल मारला.