Asian games 2023 | Avinash Sable याचा डबल धमाका, गोल्डनंतर आता सिलव्हर मेडल
Avinash Sable Win 2nd Medal In Asian Games 2023 | महाराष्ट्राच्या लेकाने चीनमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अविनाशने भारतासाठी एशियन गेम्स स्पर्धेत दुसरं पदक जिंकलं आहे.
होंगझोऊ | एशियन गेम्स 2023 स्पर्धेत टीम इंडियाच्या खेळाडूंची धमाकेदार कामगिरी सुरुच आहे. भालाफेकपटू गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने गोल्ड मेडल पटकावलंय. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या सुपुत्राने डबल धमाका केलाय. अविनाश साबळे याने फक्त 3 दिवसांमध्ये दुसरं पदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अविनाशने बुधवारी मेन्स 5 हजार मीटर स्पर्धेत सिलव्हर मेडल पटकावलं आहे. अविनाशने केलेल्या या कामगिरीसाठी त्याचं सोशल मीडियावर भरभरुन कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.
अविनाशने 5 हजार मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. अविनाशने 5 हजार मीटरचं अंतर हे 13:21:09 इतक्या वेळेत पार केलं. तर बहरीनचा यमाताव याने 5 हजार मीटरचं अंतर हे 13:17:40 इतक्या वेळेत पूर्ण केलं. अविनाशने भारताला या क्रीडा प्रकारात तब्बल 41 वर्षानंतर पदक मिळवून दिलंय. भारताने या प्रकारातील अखेरचं पदक हे 1982 साली जिंकलं होतं. त्यानंतर आता अविनाशने भारतासाठी नेत्रदीपक कामगिरी करत 41 वर्षांची प्रतिक्षा अखेर संपवली. अविनाशच्या या विजयासह भारताच्या खात्याता आता एकूण 77 पदकांची नोंद झाली आहे.
दरम्यान अविनाशने काही तासांआधी सोमवारी 2 ऑक्टोबर रोजी भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याची कामगिरी केली होती. अविनाशने भारताला 3 हजार मीटर स्टीपलचेजमध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलं होतं. अविनाशचं आणि भारताचं हे एथलेटिक्समधील पहिलं आणि एकमेव गोल्डन मेडल ठरलं होतं. अविनाशने 3 हजार मीटरचं हे अंतर फक्त 8:19:50 इतक्या वेळात पूर्ण केलं होतं. तेव्हा अविनाशचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन करण्यात आलं होतं.
अविनाश साबळे याचा डबल धमाका
🥇🥈 𝗗𝗢𝗨𝗕𝗟𝗘 𝗗𝗘𝗟𝗜𝗚𝗛𝗧 𝗙𝗢𝗥 𝗔𝗩𝗜𝗡𝗔𝗦𝗛! National Record holder Avinash Sable clinches a historic Silver medal in the Men’s 5000m – India’s first medal in this event since Asian Games 1982.
🙌 Tough luck to Gulveer Singh who finished 4th.
➡️ Follow… pic.twitter.com/k6Ico3rDsL
— Team India at the Asian Games 🇮🇳 (@sportwalkmedia) October 4, 2023
भारताच्या खात्यात किती मेडल्स?
दरम्यान भारताच्या खात्यात आता गोल्ड, सिलव्हर आणि ब्रॉन्झसह एकूण 77 मेडल्स झाले आहेत. भारताकडे सर्वाधिक ब्रॉन्झ मेडल्स आहेत. ब्रॉन्झ मेडल्सचा आकडा 32 आहे. तर 29 सिलव्हर मेडल्स आहेत. तर 16 सुवर्ण पदकं आहेत. भारत यंदा एशियन गेम्समध्ये 100 पार मजल मारेल अशी आशा प्रत्येकाला आहे. त्यामुळे भारत कुठवर मजल मारतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.