मुंबई : 15 मे रोजी थॉमस कप (Thomas Cup 2022) जिंकून भारतासाठी इतिहास रचणारा बॅडमिंटनपटू (Badminton player) लक्ष्य सेन (Lakshya Sen) मायदेशी परतलाय. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना लक्ष्य सेन म्हणाला की, भारतासाठी हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे. प्रत्येकजण एक संघ म्हणून एकत्र आले आहेत. लक्ष्य सेननेही यावेळी सांगितलं की, फायनलमध्ये पूर्णपणे वेगळे वातावरण होते. मी पहिल्या गेम गमावल्यामुळे सामन्यात माझी सुरुवात चांगली झाली नाही. मला वाटले की मी दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये खरोखरच गोष्टी बदलणार का. शेवटच्या टप्प्यात मी घाबरलो होतो, पण मी सुरक्षित खेळलो आणि घाई केली नाही. सेन म्हणाला की, ‘आम्ही स्पर्धेत इतक्या पुढे जाऊ असे आम्हाला वाटले नव्हते पण एक गोष्ट नक्की होती, आम्हाला माहित होते की आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो. आमचा विचार एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा होता आणि निकालाचा विचार करू नका. कारण काहीही अशक्य नाही, असंही सेन यावेळी म्हणाला.
‘Nothing is impossible’: Lakshya Sen on India’s historic Thomas Cup 2022 win
हे सुद्धा वाचाRead @ANI Story | https://t.co/Kw0UeOXIhL#LakshyaSen #ThomasCup2022 pic.twitter.com/IokU8W4elQ
— ANI Digital (@ani_digital) May 17, 2022
मला वाटते की मी दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये खरोखरच गोष्टी बदलल्या. शेवटच्या टप्प्यात मी घाबरलो होतो, पण मी सुरक्षित खेळलो आणि घाई केली नाही. सेन म्हणाला की, ‘आम्ही स्पर्धेत इतक्या पुढे जाऊ असे आम्हाला वाटले नव्हते पण एक गोष्ट नक्की होती, आम्हाला माहित होते की आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो. आमचा विचार एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा होता आणि निकालाचा विचार करू नका. कारण काहीही अशक्य नाही, असंही सेन यावेळी म्हणाला.