Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अखेर टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर निवृत्त

Roger Federer Retirement : एक मोठी बातमी हाती आलीय. अखेर टेनिसचा बादशाह रॉजर फेडररनं निवृत्तीची घोषणा केली आहे.

मोठी बातमी! अखेर टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर निवृत्त
रॉजर फेडरर निवृत्तImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 7:44 PM

मुंबई : एक मोठी बातमी हाती आलीय. अखेर टेनिसचा बादशाह रॉजर फेडररनं निवृत्तीची (Roger Federer Retirement) घोषणा केली आहे. त्याने पहिल्यांदा पीट सॅम्प्रासचा 14 ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचला. सेरेना विल्यम्सच्या (Serena williams) निवृत्तीच्या (Retirement) घोषणेतून टेनिस चाहत्यांना पूर्णपणे सावरता आलेलं नाही. त्यातच आता त्यांना ही फेडररची निवृत्तीची घोषणा समोर आली आहे. पुरुष टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपली व्यावसायिक कारकीर्द संपवण्याची घोषणा केली आहे.

फेडररने जाहीर केले की पुढील आठवड्यात होणारी लेव्हर कप ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची एटीपी स्पर्धा असेल आणि त्यानंतर तो कोणत्याही ग्रँड स्लॅम किंवा टूर स्पर्धेत भाग घेणार नाही. लेव्हर कप पुढील आठवड्यात लंडनमध्ये 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

रॉजर फेडरर निवृत्त

पोस्टमध्ये काय लिहिलंय?

फेडररने आपल्या चाहत्यांना एक व्हिडिओ आणि चार पानी भावनिक निवेदनाद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे. सतत दुखापत, तंदुरुस्ती आणि वय हे आपल्या निर्णयामागचं कारण म्हणून त्याने सांगितले, ‘मी 41 वर्षांचा आहे. 24 वर्षांच्या कारकिर्दीत मी 1500 हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिसने मला नेहमीच माझ्या अपेक्षा आणि अपेक्षांपेक्षा जास्त प्रेम केले आहे आणि आता मला हे मान्य केले पाहिजे की माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपवण्याची वेळ आली आहे, असं त्यांनं म्हटलंय.

फेडररविषयी…..

  1. 24 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या कारकिर्दीत 1500 हून अधिक सामने खेळणाऱ्या फेडररने 2003 मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी विम्बल्डनमध्ये पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले होते.
  2. आता वयाच्या 41 व्या वर्षी त्याने एकूण 20 ग्रँडस्लॅमसह आपली कारकीर्द थांबवण्याचा निर्णय घेतला.
  3. गेल्या जवळपास तीन वर्षांपासून दुखापतींशी झुंज देत असलेल्या फेडररने शेवटचा 2021 फ्रेंच ओपनमध्ये भाग घेतला होता. तो तिसऱ्या फेरीतील विजयानंतर निवृत्त झाला होता. तेव्हापासून तो सातत्याने कोर्टात परतण्याचा प्रयत्न करत होता.
  4. फेडररने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शेवटचे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले होते.
  5. 2019 च्या विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचला, जिथे नोव्हाक जोकोविचने त्याला एका रोमांचक सामन्यात पराभूत केले.

अलीकडेच क्रीडाविश्वातून निवृत्तीच्या बातम्या वाढत असल्याचं दिसतंय.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.