Muhammad Ali Birth Anniversary : सायकल चोराला अद्दल घडवण्यासाठी बॉक्सिंग शिकला अन् दोन दशकं बॉक्सिंग रिंगमध्ये राज्य केलं!
अलीने बॉक्सिंग रिंगमध्ये दोन दशके आपले राज्य कायम राखले, परंतु यादरम्यान त्याला त्याच्या डोक्यावर, तोंडावर, शरीरावर हजारो प्रहारही सहन करावे लागले, ज्यामुळे नंतर त्याला पार्किन्सन या आजाराने ग्रासले.
मुंबई : त्याचे पंच (ठोसे) इतके शक्तिशाली होते आणि तो आपल्या चपळतेने प्रतिस्पर्ध्याला हैराण करण्यात पटाईत होता. या हेवीवेट चॅम्पियनने आपल्या पंचेसने जगाला रोमांचित करण्याचे वचन दिले आणि त्यात तो त्यात यशस्वीदेखील झाला. बॉक्सिंगमध्ये तो सर्वांत महान होता. तो बॉक्सिंगचा समानार्थी शब्द होता. आम्ही ज्याच्याबद्दल बोलत आहोत तो दुसरा तिसरा कोणी नसून मुहम्मद अली आहे. जगप्रसिद्ध बॉक्सर मुहम्मद अली, आज यांची 80 वी जयंती आहे.
अलीने बॉक्सिंग रिंगमध्ये दोन दशके आपले राज्य कायम राखले, परंतु यादरम्यान त्याला त्याच्या डोक्यावर, तोंडावर, शरीरावर हजारो प्रहारही सहन करावे लागले, ज्यामुळे नंतर त्याला पार्किन्सन या आजाराने ग्रासले. 1981 मध्ये या आजारामुळे त्याचे मजबूत शरीर कमकुवत झाले होते. त्याचा जादुई आवाज जवळपास बंद झाला होता. त्याने अनेक ऐतिहासिक लढतींमध्ये हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली आणि नंतर त्यांचा बचावदेखील केला. त्याने कृष्णवर्णीय लोकांच्या बाजूने आवाजदेखील उठवला आणि इस्लामवरील विश्वासामुळे व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेच्या सैन्यात भरती होण्यास नकार दिला होता.
सायकल चोराला अद्दल घडवण्यासाठी बॉक्सिंग शिकला
मुहम्मद अली आजारपणातही जगभर फिरत राहिला, डोळ्यांच्या भाषेने आणि हसतमुखाने तो आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवत राहिला. मुहम्मद अली याचा जन्म 17 जानेवारी 1942 रोजी झाला. त्याने वयाच्या 12 व्या वर्षी बॉक्सिंगला सुरुवात केली कारण कोणीतरी त्याची नवीन सायकल चोरली होती आणि त्याने पोलीस कर्मचारी जो मार्टिन यांच्यासमोर शपथ घेतली की, ज्याने कोणी त्याची सायकल चोरली आहे तो त्याला अद्दल घडवेल. अलीचे वजन फक्त 89 पाऊंड होते पण मार्टिन यांनी त्याला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. यामुळे त्याच्या अमेच्योर करिअरची सुरुवात झाली, जी 1960 मध्ये लाइट हेवीवेट ऑलिम्पिक सुवर्णपदकाने संपली. यानंतर त्याने वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली.
गोर्या माणसांसोबत भांडणानंतर ऑलिम्पिक पदक नदीत फेकून दिलं
त्याच्या ‘द ग्रेटेस्ट’ या आत्मचरित्रात अलीने लिहिले आहे की जेव्हा मोटारसायकलवरील गोर्या माणसांच्या एका गटाने त्याच्याशी भांडण केले तेव्हा त्याने त्याचे पदक ओहायो नदीत फेकून दिले. काहींचं म्हणणं आहे की, ही कथा कदाचित रचली गेली असावी, कारण अलीने नंतर मित्रांना सांगितले होते की त्याचे पदक खरोखर हरवले आहे.
मी जगात सर्वात महान आहे : मुहम्मद अली
‘जनसत्ता’च्या रिपोर्टनुसार अली जेव्हा यशाच्या शिखरावर होता तेव्हा तो आपले हेवीवेट मुकाबले असे खेळायचा की यापूर्वी कोणीही अशा लढती दिल्या नसतील. त्याने खतरनाक सोनी लिस्टनला दोनदा धूळ चारली. फिलिपाइन्समध्ये जो फ्रेझियरशी लढताना त्याने मृत्यूशी झुंज दिली, त्या सामन्यावेळी तो मृत्यूच्या जबड्यातून परतला होता. त्याने अनेक मोठमोठ्या बॉक्सर्सशी स्पर्धा करून लाखो डॉलर्स कमावले. अली नेहमी म्हणायचा, ‘मी सर्वात महान आहे.’ आणि काही लोक त्याच्याशी असहमत असायचे.
1964 साली धर्म बदलला
अलीचा जन्म कॅसियस मार्सेलस क्ले म्हणून झाला होता, परंतु 1964 मध्ये लिस्टनला पराभूत करून हेवीवेट विजेतेपद जिंकल्यानंतर, त्याने काळ्या मुस्लिमांचा (इस्लामिक देश) सदस्य असल्याची घोषणा करून बॉक्सिंग जगाला आश्चर्यचकित केले आणि नंतर त्याने स्वतःचे नाव बदलले. त्यानंतर जग त्याला मुहम्मद अली या नावानेच ओळखत राहिले.
29 हजार ठोसे खाल्ले, त्याबदल्यात 57 मिलियन डॉलर्स कमावले
अलीने एकदा म्हटले होते की, बॉक्सिंग रिंगमध्ये त्याने त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीत 29,000 पंच सहन केले आणि 5 कोटी 70 लाख डॉलर्स कमावले. त्याने खाल्लेले पंचेस पुढे त्याच्यासाठी खूप त्रासदायक ठरले. त्यावरील उपचारांसाठी बरेच पैसे खर्च करावे लागले. या उपचारांसाठी त्याची बहुतेक कमाई गेली. असे असूनही त्याने इस्लामचा प्रचार सुरूच ठेवला आणि जगभरातील नेत्यांची भेट घेतली. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकसह त्याने अलीकडच्या वर्षांत काही दौरेही केले आहेत. 1960 च्या दशकात यूएस आर्मीमध्ये भरती होण्यास नकार देऊनही,अलीचा लोकांवर जादुई प्रभाव कायम राहिला.
चार बायका आणि नऊ मुलं
अलीचा जन्म 17 जानेवारी 1942 रोजी कॅसियास मार्सेलस क्ले म्हणून झाला होता. परंतु नंतर त्याने इस्लाम स्वीकारला आणि आपले नाव बदलले. त्याच्या 4 बायका आणि 9 मुले आहेत ज्यात त्याची मुलगी लैला ही तिच्या वडिलांप्रमाणेच विश्वविजेती बॉक्सर आहे. त्याची पहिली पत्नी सोंजी रोई होती जिच्याबरोबर तो केवळ दोन वर्षे होता. धर्म बदलल्यानंतर त्याने 17 वर्षीय बेलिंडा बायडशी लग्न केले. बेलिंडाने त्याच्या चार मुलांना जन्म दिला. त्याची तिसरी पत्नी वेरोनिका पोर्श होती. या दोघांना दोन मुलं होती. त्यानंतर त्याने लोनी विलियम्स हिच्याशी लग्न केलं. या जोडप्याने पुढे एक मुलगा दत्तक घेतला.
इतर बातम्या
(Boxer Muhammad Ali life story, know Everything about him)