Video कुस्तीपटू साक्षी मलिकची तडकाफडकी निवृत्ती, WFIअध्यक्षपदी ब्रिजभूषण सिंह यांच्या माणसाचीच निवड

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्व खेळाडूंना आश्वासन दिलेलं की ब्रिजभूषण सिंग यांच्या घरातील कोणी निवडणूक लढवणार नाही. या अटीवरच खेळाडूंनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र त्यांच्या जवळचा माणूस निवडून आल्याचं म्हणत साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली आहे.

Video कुस्तीपटू साक्षी मलिकची तडकाफडकी निवृत्ती, WFIअध्यक्षपदी ब्रिजभूषण सिंह यांच्या माणसाचीच निवड
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 9:06 PM

मुंबई : डब्लूएफआयच्या नवीन अध्यक्षपदी ब्रिजभूषण सिंह यांच्यानंतर संजय सिंग यांची निवड झाली आहे. ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तीयाची अध्यक्षपदी निवड झाल्याने साक्षी मलिकने पत्रकार परिषदेमध्ये तिचे शूज टेबलावर ठेवत आपण कुस्तीमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. (Wrestling Federation of India) च्या निवडणुका झाल्यावर महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने मोठी घोषणा केली आहे.

काय म्हणाली साक्षी मलिक?

आम्ही जवळपास 40 दिवस रस्त्यावर झोपलो होतो. देशाच्या अनेक भागांमधून लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. यामध्ये वृद्ध आणि महिलांची मोठ्या प्रमाणात सहभाग होता, ज्यांना खायला प्यायला नाही अशा लोकांचाही यामध्ये समावेश होता. मात्र आम्ही जिंकलो नाही पण तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. आम्ही लढलो पण संजय सिंह हा ब्रिजभूषण सिंह यांच्या जवळचा सहकारी निवडून आला. आता मी कुस्ती सोडत असल्याचं साक्षीने सांगितलं. यावेळी तिने पत्रकारांसमोरच आपले रेसलिंगचे शूज ठेवले.

क्रीडा मंत्र्यांनी सांगितलं होतं की ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याशी संबंधित कोणीही महासंघात येणार नाही, पण मुलींना न्याय मिळेल असे मला वाटत नाही. पार पडलेल्या निवडणुकीमध्ये ब्रिजभूषण यांच्या माणसाचा विजय झाला आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असून ते न्याय देतील. जे आश्वासन सरकारने दिलं होतं ते पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले असल्याचं बजरंग पुनियने म्हटलं आहे.

नेमकं काय होतं प्रकरण?

दरम्यान, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यास इतर खेळाडूंनी ब्रिजभूषण सिंग यांनी महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. सर्व मोठ्या खेळाडूंनी दिल्लीमधील जंतर-मंतर मैदानावर मोठं आंदोलन उभारलं होतं. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.