Video : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड जिंकताच भर मैदानात प्रियकराने केलं असं काम, प्रेक्षकही झाले आवाक्

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रोज काही ना काही घडत असतं. काही जणांच्या पदरी आनंद, तर काहींच्या पदरी निराशा पडत आहे. काही जणांचं पदक अवघ्या काही गुणांनी हुकलं आहे. असं ऑलिम्पिक स्पर्धेत बरंच काही घडत असताना एक वेगळीच अनुभूती क्रीडारसिकांना आली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड जिंकताच भर मैदानात प्रियकराने केलं असं काम, प्रेक्षकही झाले आवाक्
Image Credit source: (फोटो- VCG/VCG via Getty Images)
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 4:25 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होऊन आता आठवडा उलटला आहे. भारताच्या पारड्यात आतापर्यंत तीन मेडल पडले आहेत. अधिक पदकं मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे, या ऑलिम्पिक स्पर्धेत काही कारणावरून वादाला फोडणी देखील मिळाली आहे. तर काही ठिकाणी आनंदाचे क्षण अनुभवता आले आहेत. चीनच्या ऑलिम्पिक स्पर्धेकासाठी ही स्पर्धा काही कारणानी स्मरणीय ठरली. कारण स्पर्धेत गोल्ड पदक मिळवण्यासोबत प्रिय व्यक्तीने लग्नासाठी मागणीही घातली गेली आहे. चीनची बॅडमिंटनपटू हुआंग या कियोंग पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील हा क्षण कधीही विसरू शकत नाही. 2 ऑगस्टला तिने आपला साथीदार झेंग सिवेईसोबत मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक मिळवलं. चीनच्या या जोडीने दक्षिण कोरियाच्या किम वोन हो आणि जियोंग ना युन या जोडीला पराभूत केलं. या सामन्यात चीनच्या जोडीचं वर्चस्व पाहायला मिळालं. 41 मिनिटात दक्षिण कोरियन जोडीला 21-8, 21-11 ने पराभूत केलं.

मिश्र दुहेरीत विजय मिळवताच पदक सोहळा पार पडला. यात हुआंग या कियोंगने गोल्ड पदक मिळवलं. या क्षणाची प्रत्येक स्पर्धक आतुरतेने वाट पाहात असतो, तो क्षण ती अनुभवत होती.हा क्षण तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणापैकी एक होता. असं असताना कियोंगच्या आनंदात आणखी भर पडली. कारण तिचा प्रियकर लियू युचेनने भर मैदानात लग्नासाठी मागणी घातली. हे सर्व पाहून उपस्थित प्रेक्षकही आवाक् झाले. कियोंगने त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत होकार दिला. प्रियकर लियू युचेनने गुडघ्यावर बसून प्रेम व्यक्त केलं आणि हुआंग या कियोंगला अंगठी घातली. तिचा प्रियकर लियू युचेन हा देखील बॅडमिंटनपटू असून चीनसाठी खेळतो.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत यापूर्वीही असं चित्र पाहायला मिळालं आहे. ओपनिंग सेरेमनीवेळी अर्जेंटिनाच्या एका खेळाडूने आपल्या जोडीदाराला सर्वांसमोर प्रपोज केलं होतं. अर्जेंटिनाच्या मेन्स हँडबॉल टीमचा प्लेयर पाबलो सिमोनेटने महिला हॉकी संघाची खेळाडू मारिया कँपॉयला प्रपोज केलं होतं. दोघंही एकमेकांना 2015 पाहून ओळखतात. Olympic Games ने आपल्या एक्स हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता.

Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.