French Open 2022 : इगा स्वांतेककडून कोको गॉफचा पराभव, 21 वर्षीय स्वांतेकची बहारदार कामगिरी
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा स्विटेकने ब्लॉकबस्टर फायनलमध्ये अमेरिकेच्या कोको गॉफचा 6-1, 6-3 असा सहज पराभव केला
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा स्वांतेकने (Iga Swiatek) ब्लॉकबस्टर फायनलमध्ये (French Open 2022) अमेरिकेच्या कोको गॉफचा (Coco Gauff) 6-1, 6-3 असा सहज पराभव करून फ्रेंच ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. स्वांतेकने विजय मिळवण्यापूर्वी सलग पाच गेम जिंकले आहेत. 21 वर्षीय स्वांतेकचे हे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. 2020मध्ये रोलँड गॅरोस येथे देखील विजय मिळवला होता. हा तिचा 35वा विजय होता. स्टेड रोलँड गॅरोस येथे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इगा स्वांतेकने कोको गॉफविरुद्ध 6-1 असा पहिला सेट जिंकला आहे. या मोसमात उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या इंगा स्वांतेकने संपूर्ण स्पर्धेत आपले एकतर्फी वर्चस्व कायम ठेवले आहेत. 21 वर्षीय स्वंतेकने संपूर्ण स्पर्धेत फक्त एक सेट गमावला आणि ६-२च्या सरासरी स्कोअरलाइनसह अधिक प्रसंगी सेट जिंकले. एवढंच नाही तर या विजयासह त्याने महान अमेरिकन खेळाडू व्हीनस विल्यम्सचा सलग 35 सामन्यांमध्ये विजय मिळवण्याच्या विक्रमची बरोबरी केली आहे.
Iga Światek wins* #FrenchOpen2022 Women’s Singles title
— ANI (@ANI) June 4, 2022
कोको गॉफने आव्हान पूर्ण केले नाही
इगा स्वांतेकची ही केवळ दुसरी ग्रँडस्लॅम फायनल होती. स्वत:ला राफेल नदालची मोठी चाहती म्हणवणाऱ्या स्पॅनिश सुपरस्टारप्रमाणे लाल रंगावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अंतिम फेरीत त्याच्या प्रमाणे 18 वर्षीय कोको गॉफ होती. ती पहिल्यांदा स्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. अनेक अनुभवी खेळाडूंना थक्क करणाऱ्या इगासाठी कोकोचे आव्हान फारसे अवघड नव्हते.
फ्रेंच ओपन, पाहा व्हिडीओ
Together again ?#RolandGarros | @iga_swiatek pic.twitter.com/KEgxf2pr45
— Roland-Garros (@rolandgarros) June 4, 2022
पहिल्या सेटमध्ये इगाने कोणताही त्रास न होता जिंकला होता. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये कोकोने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन खेळाडूने सेटमधील पहिले दोन गेम जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली होती. नंतर इगाने आपला स्वभाव दाखवला आणि 6-1,6-3 असा सामना जिंकून विजेतेपदाच्या सर्व आशा धुडकावून लावल्या.
हे वर्ष चांगलं
हे वर्ष पोलंड स्टारसाठी चांगलं वर्ष ठरलंय. ऑस्ट्रेलियन ओपनच्या निराशेनंतर इगाने लगोपाठ विजय मिळवला आहे. तिच्यापुढे कोणताही खेळाडू टिकू शकला नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन बार्टीच्या अचानक निवृत्तीनंतर एप्रिलमध्ये डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये इगानेही पहिलं स्थान पटकावलंय. ती प्रथमच पहिल्या क्रमांकावर पोहोचली होती. या यशानंतर तिला तिथून दूर करणं सध्या सोपं नाहीये.