ख्रिस्तियानो रोनाल्डोचा जलवा! उणे 20 डिग्री थंड पाण्यात घेतली उडी, Watch Video
दिग्गज फुटबॉलपटू आणि अल नासर क्लबचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्ड कुटुंबासोबत लॅपलँडमध्ये ख्रिसमस सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेला आहे. यावेळी त्याने थंड पाण्यात डुबकी घेण्याचा ट्रेंड फॉलो केला. तसेच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे जगभरात चाहते आहेत. त्याने एखादी गोष्ट केली की जगभरात ट्रेंड ठरतो. पण याच ख्रिस्तियानो रोनाल्डोने एक ट्रेंड फॉलो केला आहे. त्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो ख्रिसमस सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कुटुंबियांसोबत फिनलँडच्या लॅपलँडला गेला आहे. यावेळी रोनाल्डोने उणे 20 डिग्री सेल्सियस तापमानात एका स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्याने फक्त शॉर्ट्स घातली होती. तसेच आसपास किती तापमान आहे याचाही त्याने उल्लेख केला. अशा थंडीत कपड्यांशिवाय उभं राहणंही कठीण असतं. तिथे ख्रिस्तियानो रोनाल्डो पाण्यात उतरला. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही मिनिटातच 93.1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला. पूलमध्ये उतरण्यापूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डो सांगतो की, तुम्हाला विश्वास बसणार की इथलं तापमान उणे 20 डिग्री सेल्सियस आहे. अशा थंड पाण्यात उडी मारण्याचा अनुभव घेण्यास जात आहे.
रोनाल्डो यानंतर हळूहळू शिडीवरून पूलमध्ये उतरतो. हाडं गोठवण्याऱ्या थंडीत असा प्रयोग करणं किती कठीण आहे याचा अंदाज न केलेला बरा. रोनाल्डो पूलमध्ये उतरत असताना मागून कोणीतरी बोलतं की, पूलची खोली ही 2 मीटर आहे. यानंतर रोनाल्डो शिडी पकडून गळ्यापर्यंत पाण्यात उतरतो आणि एक्सायेडेट होत सांगतो की, पाणी थोडाच थंडा आहे आणि खूप चांगलं वाटत आहे. पण काही मिनिटाच रोनाल्डो पाण्याबाहेर निघतो.
It’s just a little cold 🥶😂
Watch my complete family trip video: https://t.co/hUJ1n3v0h1 pic.twitter.com/5yOUzeVvEb
— Cristiano Ronaldo (@Cristiano) December 24, 2024
सोशल मीडियावर गेल्या काही वर्षात आईस बाथचा एक ट्रेंड आला आहे. थंड पाण्यात डुबकी घेतल्याने लठ्ठपणा, नैराश्य आणि चिंता यासारख्या परिस्थितींपासून दूर राहता येतं, असं सांगितलं जातं. ख्रिस्तियानोचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूल घालत आहे. यावर 15 हजाराहून अधिक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
@DrSoodoo x Handle हेल्थ एक्सपर्ट आणि शास्त्रज्ञ नवींद्र सूडू यांनी लिहिले, थंड पाण्यात उतरण्याचे अनेक आरोग्यादायी फायदे आहेत. हे शरीराची जळजळ कमी करते, स्नायू पुनर्प्राप्ती सुधारते. यासोबतच हे मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आणखी एका युजरने लिहिलं की, रोनाल्डोचा फिटनेसचा प्रश्नच येत नाही. त्यामुळेच रोनाल्डो हा इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू आहे.