फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो मुस्लिम होणार! धर्मांतरावर सहकारी खेळाडूचा धक्कादायक खुलासा
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे जगभरात चाहते आहेत. रोनाल्डोने 2022 मध्ये सौदी अरेबियाच्या अल नासर फुटबॉल क्लबसोबत करार केला होता. 2025 वर्षापर्यंत या संघाकडून खेळणार आहे. असं असताना त्याच्या सहकारी फुटबॉलपटूने रोनाल्डोबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संपूर्ण जगात नावलौकिक आहे. त्याने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टवर मिनिटातच लाखोंच्या कमेंट्स पडतात. युट्यूबवरवर त्याने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळेच सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. यावरून ख्रिस्तियानो रोनाल्डोची लोकप्रियता लक्षात येते. पण आता ख्रिस्तियानो रोनाल्डो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कारण ख्रिस्तियाने रोनाल्डो इस्लाम धर्म स्वीकारणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण ही बातमी नेमकी आली तरी कुठून? या बातमीत काही तथ्य आहे वगैरे प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. ख्रिस्तियानो रोनाल्डोने 2022 मध्ये सौदी अरेबियातील अल नासर फुटबॉल क्लबशी दोन वर्षांसाठी करार केला आहे. 2025 वर्षापर्यंत त्याचा हा करार असणार आहे. याच क्लबमध्ये रोनाल्डोसोबत गोलकीपर वलीद अब्दुल्ला खेळतो. आता वलीदने रोनाल्डो हा इस्लाम धर्म स्वीकारणार असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. वलीदच्या या खुलाशामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. नेमकं काय झालं? खरंच असं आहे का वगैरे वगैरे.. वलिदने एका टीव्ही शोमध्ये हा खुलासा केला आहे.
वलिद अब्दुल्ला म्हणाला की, ‘रोनाल्डोला खरोखर इस्लाम धर्म स्वीकारायचा आहे. मी त्याच्याशी याबाबत बोललो तेव्हा त्याने यात रस दाखवला आहे. गोल केल्यानंतर त्याने मैदानात सजदा केला आहे आणि कायम इतर खेळाडूंना नमाज अदा करण्यास प्रोत्साहित करतो. तसेच इस्लाम धर्माच्या रितीचं पालन करतो. जेव्हा रोनाल्डोने गोल केल्यानंतर मैदानावर सजदा केला तेव्हा सर्व खेळाडूंनी एकत्रितपणे ‘अल्लाहु अकबरची’ जयघोष केला होता.’ रोनाल्डोचा जन्म मडेरा येथे 5 फेब्रुवारी 1985 रोजी झाला आहे आणि धर्माने ख्रिश्चन आहे.
‘सराव करताना जेव्हा अजानची आवाज येतो. तेव्हा रोनाल्डो प्रशिक्षकांना अजान संपेपर्यंत सराव थांबवण्यास सांगतो. सुरुवातील मी ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबत होतो. कारण देशाची संस्कृती, क्लब आणि अन्य बाबींबाबत माहिती नव्हतं. तो कायम मला प्रश्न विचारायचा.’ असंही वलिद अब्दुल्ला याने सांगितलं. एका रिपोर्टनुसार, अल नासर क्लबमध्ये सहभागी होण्यापूर्वी रियल माद्रिदचे माजी सहकारी मेसूत ओझिल आणि करीम ब्रेंझेमा यांनी त्याला धर्मांतरण करण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. 39 वर्षीय रोनाल्डोने फीफा वर्ल्डकप 2022 आधीच मँचेस्टर युनायटेड सोडलं होतं. अल नासर क्लबमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता. या क्लबकडून खेळण्यासठी त्याला वर्षाला जवळपास 1800 कोटी मिळतात.