फुटबॉल होणार अधिक स्मार्ट, AI च्या मदतीने स्पर्धेची उत्सुकता आणखी वाढणार!
जगभरात फुटबॉलचे चाहते आहेत. मात्र अनेक ठिकाणी फुटबॉलचे चाहते असूनही हा खेळ काही रुजलेला नाही. त्यामुळे या खेळाचं भविष्य पाहता आणि एआयची कास धरली जाणार आहे. यासाठी एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे.

जर्मन फुटबॉल असोसिएशनच्या डीएफबी जीएमबीएच अँड कंपनी केजी (डीएफबी) यांनी फुटबॉलसाठी आधुनिकतेची कास धरली आहे. यासाठी जागतिक आघाडीच्या टीसीजी डिजिटलशी भागीदारी केली आहे. टीसीजी जागतिक पातळीवर डेटा इंटेलिजेंस आणि एआय चालित ट्रान्सफॉर्मेशनमध्ये अग्रणी कंपनी आहे. या माध्यमातून चाहते, खेळाडू आणि भागधारक यांना भविष्यात या खेळाची उच्चतम अनुभूती घेता येणार आहे. या भागीदारीने फुटबॉल विश्वात नव्या अध्यायची सुरुवात होणार आहे. नवे उपक्रम राबवून आणि चाहत्यांच्या सहभागाचे नवे मार्ग तयार करण्याचा हेतू आहे. त्यामुळे यापुढे फुटबॉल केवळ एक खेळ म्हणून पाहिला जाणार नाही, तर अब्जावधी लोकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ तयार करेल. चाहत्यांच्या हृदयात फुटबॉल खेळाबाबत एक वेगळं स्थान या भागीदारीच्या माध्यमातून होईल. फुटबॉल नवोपक्रम आणि चाहत्यांच्या संवादाची पायाभरणी या माध्यमातून होणार आहे. टीसीजी डिजिटल आणि डीएफबी एकत्रितपण चाहत्यांना अतुलनीय अनुभव देऊन खेळाचे भविष्य एक्सप्लोर करण्याचे उद्दिष्ट ठेवतात.
के डॅमहोल्झ, डायरेक्टर मीडिया राइट्स,डीएफबी यांनी सांगितलं की, “जर्मन फुटबॉल असोसिएशन म्हणून आपल्या सर्वांना आवडणाऱ्या खेळात सुधारणा करण्याची आमची इच्छा आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही विचार केला आहे. टीसीजी डिजिटलची एआय क्षमता चांगली आहे. इतर अनेक औद्योगिक क्षेत्रात या सिद्ध तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे वापर होत आहे. या तंत्रज्ञानाची क्षमता पाहता ही भागीदारी परिपूर्ण ठरणार आहे. आम्ही नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी सज्ज आहोत. व्यवहार्य सिद्ध होणारी प्रत्येक चाचणी आम्ही आमच्या अंमलात आणू. मीडिया पार्टनर्स आणि चाहत्यांसाठी आमच्या लीग आणि स्पर्धांचे मार्केटिंग या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू.’
देबदास सेन, सीईओ, टीसीजी डिजिटल “टीसीजी डिजिटलमध्ये, आम्ही डेटा इंटेलिजेंस आणि एआयच्या परिवर्तनकारी शक्तीवर विश्वास ठेवतो. आमच्या एआय प्लॅटफॉर्म एमक्यूबद्वारे हे शक्य आहे. फुटबॉल ही क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक परिपूर्ण टप्पा आहे आणि डीएफबीसोबतचे आमचे सहकार्य हे नवोन्मेष आणि उत्कृष्टतेसाठी आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.”
फ्रँकफर्टमधील डीएफबी मुख्यालयात या भागीदारीची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात के डॅमहोल्झ (डीएफबीचे संचालक मीडिया राईट्स, डीएफबी), कौशिक मौलिक (संस्थापक – इंडिया फुटबॉल सेंटर), देबदास सेन (सीईओ – टीसीजी डिजिटल आणि ग्लोबल मार्केटिंग हेड, टीसीजी डिजिटल) या प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती लावली. तसेच फॅबियन व्हेट (आंतरराष्ट्रीय प्रमुख – टीएसजी हॉफेनहाइम), जान मेयर (इनोव्हेशनचे सीईओ – टीएसजी हॉफेनहाइम), नवास मीरन (अध्यक्ष – केरळ फुटबॉल असोसिएशन), डायटमार बेयर्सडोर्फर (सीईओ – एफसी इंगोल्स्टॅड), गेरहार्ड रिडल (संस्थापक – इंडियन फुटबॉल सेंटर, ऑस्ट्रिया) आणि जर्मनीतील भारतीय समुदायाचे प्रमुख प्रतिनिधी यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.