दे दणादण…! एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेचा नारळ फुटला
एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेला मुंबईतील कुपरेज मैदानावर सुरुवात झाली आहे. काल मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एफसी बार्यन महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेच्या लोगोच अनावरण करण्यात आलं होतं.
मुंबई : मुंबईतील कुपरेज मैदानात 8 फेब्रुवारीपासून एफसी बायर्न अंडर 14 महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेचा नारळ फुटला. या स्पर्धेच्या उद्घाटनला राज्याचे क्रीडा मंत्री आणि उत्तम एथलिट असलेले गिरीश महाजन उपस्थित होते. क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेची सुरुवात झाली. क्रीडा मंत्र्याशिवाय एफसी बायर्न म्युनिच क्लब साऊथ आशिया हेड Maximilian Haschke यांची मुख्य उपस्थिती होती. मुंबईत या स्पर्धेची जिल्हा आणि विभाग स्तरावरील स्पर्धेची सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या या जबरदस्त प्लानिंगमुळे महाराष्ट्राच्या मातीत मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यासारखे पट्टीचे फुटबॉलर तयार होणार आहेत.
राज्य सरकारचं तगडं प्लानिंग
एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेत राज्यातील 36 जिल्ह्यांमधील शाळा सहभागी होणार आहेत. त्यानंतर बाद फेरीतून अखेरीस प्रत्येक जिल्ह्यातून 1 टीम निवडली जाणार आहे. अशा प्रकारे 36 संघ होतील. सामन्यात जिंकणारे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. अशाप्रकारे एकूण स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर सर्वोत्तम 20 खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
या 20 खेळाडूंना परदेशात एफसी बायर्न कल्बच्या अनुभवी प्रशिक्षक आणि खेळाडूंकडून प्रशिक्षण देणार आहेत. राज्य सरकारच्या या जबरदस्त प्लानिंगमुळे राज्यात फुटबॉलचा आणखी प्रचार प्रसार होईल. तसेच 20 खेळाडूंचं नशिबही पालटेल.
क्रीडामंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?
“फुटबॉल या क्रीडाप्रकाराबाबत म्हटलं तर आपण देश म्हणून फार मागे आहोत. फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे आम्ही या क्लबसोबत सामंजस्य करार केलं. त्यानुसार आपल्या खेळाडूंना, प्रशिक्षकांना ट्रेनिंग मिळावं. यातून चांगले खेळाडू तयार व्हावेत, जे भविष्यात देशाचं प्रतिनिधित्व करतील. असे खेळाडू आम्हाला तयार करायचे आहेत. आयोजनामागील आमचा असा उद्देश आहे” असं क्रीडा मंत्री यांनी नमूद केलं.
एफसी बायर्न म्युनिच क्लबबाबत थोडक्यात
एफसी बायर्न म्युनिच हा जगातील अग्रगण्य आणि लोकप्रिय फुटबॉल क्लबपैकी एक आहे, जो आजमितीस जर्मन फुटबॉलमध्ये राष्ट्रीय लीग मध्ये 32 वेळा विजेता ठरलेला आहे. इतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांमध्ये चॅम्पियन्स लीग 06 वेळा, UEFA कप 2 वेळा अशा प्रकारची कारकीर्द आहे. फुटबॉल आणि शिक्षणाद्वारे तरुणांचे जीवन सुधारणे. विविध कोचिंग आणि संशोधन मॉड्यूल्सद्वारे फुटबॉलचे ज्ञान आणि समज वाढवणे. तळागाळातील फुटबॉल खेळाला चालना देणे, हा स्पर्धेमागे उद्देश आहे.