Qat vs Ind: मॅच रेफरीच्या वादग्रस्त निर्णयाचा फटका, टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर, कतार 2-1 ने विजयी

India vs Qatar FIFA World Cup 2026 Qualifier: टीम इंडिया-कतार सामन्यात मॅच रेफरीने 75 व्या मिनिटाला प्लेमधून बाहेर झालेला बॉल योग्य ठरवला आणि त्याचा फायदा घेत कतारने गोल केला. यामुळे टीम इंडिया पिछाडीवर गेली.

Qat vs Ind: मॅच रेफरीच्या वादग्रस्त निर्णयाचा फटका, टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर, कतार 2-1 ने विजयी
IND vs QAT FootballImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 2:11 AM

साऱ्या भारतीयांसाठी एक वाईट आणि तेवढीच संतापजनक बातमी समोर आली आहे. मॅच रेफरीच्या वादग्रस्त निर्णयामुळे फुटबॉल टीम इंडिया 2026 च्या फीफा वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडली आहे. टीम इंडियाला 11 जून रोजी कतारकडून 2-1 च्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. या सामन्याचं आयोजन हे दोहा येथे करण्यात आलं होतं. टीम इंडियाच्या या पराभवासह असंख्य भारतीय आणि फुटबॉल प्रेमींचं स्वप्नभंग झालं आहे. मॅच रेफरीने दिलेल्या या वादग्रस्त निर्णयामुळे सोशल मीडियावार वादाला तोंड फुटलं आहे. फुटबॉल चाहत्यांनी या निर्णयाविरुद्ध जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

लालियनजुयाला छांगटे याने केलेल्या गोलमुळे टीम इंडिया आघाडीवर होती. मात्र मॅच रेफरीने दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे टीम इंडियाला मोठा फटका बसला. तर हा निर्णय कतारच्या पथ्यावर पडला आणि त्यांनी सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर कतारने दुसरा गोल करत सामना जिंकला. टीम इंडियाकडून लालियनजुयाला छांगटे याने 37 व्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली होती. तर कतारसाठी यूसुफ अयमन आणि अहमद अल रावी या दोघांनी गोल केला.

वादग्रस्त निर्णयाचा टीम इंडियाला फटका

नक्की वाद काय?

मॅच रेफरीने दिलेला वाद हा कतरच्या पहिल्या गोलबाबत आहे. मॅच रेफरीने कतरच्या बाजूने निर्णय देत टीम इंडियावर उघड उघड अन्याय केल्याचं, व्हायरल व्हीडिओतून पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हीडिओत फुटबॉल गोलपोस्टच्या बाहेर गेलेला दिसत आहे. कतरच्या खेळाडूंनी बॉल लाईनच्या बाहेर गेलेला असूनही आत ढकलला आणि गोलपोस्टमध्ये मारला. यूसुफ अयमन याने हा गोल केला. टीम इंडियाने यावरुन आक्षेप घेतला मात्र याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे कतारने सामन्यात 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे सोशल मीडियावर फुटबॉल समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मॅच रेफरीने दिलेल्या या वादग्रस्त निर्णयामुळे टीम इंडियाने आपली लय गमावली. त्याचा फायदा हा कतारने घेतला. कतारचा अहमद अली रावी याने 85 व्या मिनिटाला दुसरा गोल केला आणि सामना खिशात घातला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.