Paris Olympics: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय चमूत महाराष्ट्राचे 5 खेळाडू, वाचा कोण ते आणि कोणत्या स्पर्धेसाठी

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताकडून 117 खेळाडूंचा चमू पॅरिसमध्ये गेला आहे. या खेळाडूंकडून क्रीडारसिकांना पदकाची अपेक्षा आहे. हरयाणा आणि पंजाबमधून एकूण 42 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. हरयाणातून 24, तर पंजाबमधून 18 स्पर्धक आहेत. तर महाराष्ट्रातून पाच खेळाडूंना संधी मिळालेली आहे.

Paris Olympics: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय चमूत महाराष्ट्राचे 5 खेळाडू, वाचा कोण ते आणि कोणत्या स्पर्धेसाठी
Follow us
| Updated on: Jul 22, 2024 | 6:49 PM

ऑलिम्पिक स्पर्धेनिमित्त जगभरातील खेळाडूंचा कुंभमेळा पॅरिसमध्ये भरला आहे. 26 जुलैपासून या स्पर्धेला अधिकृतरित्या सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 200हून अधिक देशांनी भाग घेतला आहे. तर रशिया आणि बेलारूस या देशांना या स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे. ऑलिम्पिक इतिहासात भारताने आतापर्यंत 35 पदकांची कमाई केली आहे. यात 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वाधिक पदकांची कमाई केली. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आशा वाढल्या आहेत. 100 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारत देशातून 117 खेळाडूंचा चमू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला आहे. भारतीय चमूत सर्वाधिक खेळाडू हे हरयाणा आणि पंजाबमधील आहेत. या दोन राज्यांतून एकूण 42 स्पर्धकांची वेगवेगळ्या खेळांसाठी निवड झाली आहे.

हरयाणातून 24, तर पंजाबमधून 18 खेळाडूंची निवड झाली आहे. उत्तराखंडमधून 4, उत्तर प्रदेशमधून 8, राजस्थानमधून 2, मध्य प्रदेशमधून 3, बिहारमधून 1, पश्चिम बंगालमधून 3, सिक्किममधून 1, आसामधून 1, मणिपूरमधून 2, झारखंडमधून 1, ओडिशामधून 2, गुजरातमधून 2, महाराष्ट्रातून 5, तेलंगाणातून 4, आंध्र प्रदेशमधून 4, कर्नाटकमधून 7, तामिळनाडूतून 13 आणि केरळमधून 5 जण आहेत. महाराष्ट्रातून प्रवीण जाधव, अविनाश साबळे, सर्वेश कुशारे, चिराग शेट्टी आणि स्वप्निल कुसले यांचा समावेश आहे. तिरंदाजीत प्रवीण जाधव, शूटिंगमध्ये स्वप्नील कुसले, एथलॅटिक्समध्ये अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे, तर बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टीची निवड झाली आहे.

महाराष्ट्रातील खेळाडू आणि त्यांच्या स्पर्धेची तारीख, वेळ

25 जुलै 2024 :

  • तिरंदाजी – पुरुषांची वैयक्तिक रँकिंग फेरी (प्रवीण जाधव) – संध्याकाळी 5:45 वाजता

27 जुलै 2024 :

  • बॅडमिंटन – पुरुष दुहेरी गट टप्पा (सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी) – दुपारी 12 वाजता

28 जुलै 2024 :

  • पुरुष दुहेरी गट टप्पा (सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी)- दुपारी 12 वाजता

29 जुलै 2024 :

  • पुरुष दुहेरी गट टप्पा (सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी)- दुपारी 12 वाजता
  • तिरंदाजी- पुरुष सांघिक फेरी 16 (प्रवीण जाधव) – दुपारी 1 वा.

30 जुलै 2024 :

  • पुरुष दुहेरी गट टप्पा (सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी) दुपारी 12 वाजता

31 जुलै 2024 :

  • पुरुष दुहेरी गट टप्पा (सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी) दुपारी 12 वाजता
  • नेमबाजी – 50 मी रायफल 3 पॉस. पुरुष पात्रता (स्वप्नील कुसळे) – दुपारी 12.30 वा.

5 ऑगस्ट 2024 :

  • ऍथलेटिक्स – पुरुषांची 3000 मीटर स्टीपलचेस फेरी 1 (अविनाश साबळे) – रात्री 10:34 नंतर

7 ऑगस्ट 2024 :

  • ऍथलेटिक्स – पुरुष उंच उडी पात्रता (सर्वेश कुशारे) – दुपारी 1:35 नंतर
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.