क्रीडा विश्वातून मोठी बातमी | लाईव्ह मॅचमध्ये अंगावर वीज कोसळून खेळाडूचा मृत्यू, थरकाप उडवणारा Video
indonesia lightning strikes video : लाईव्ह सामन्यावेळी खेळाडू बॉलची वाट पाहत होता, मात्र बॉलच्या आधी काळाने त्याला गाठलं. भर सामन्यात खेळाडूच्या अंगावर वीज कोसळून जाग्यावरच त्याचा मृत्यू झाला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : क्रीडा विश्वातून अंत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाईव्ह सामन्यावेळी खेळाडूच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी ही घटन घडली होती, वीज पडलेल्या खेळाडूला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं होतं. मात्र त्याचा आधीच मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती समजत आहे. अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
इंडोनेशियामध्ये पश्चिम जावामधील एफबीआय सुबांग आणि एफसी बांडुंग या दोन संघांमध्ये फुटबॉल सामना सुरू होता. व्हिडीओमध्य दिसत आहे की, फुटबॉल सामना सुरू असून खेळाडू त्याच्याकडे बॉल येण्याची वाट पाहत होता. मात्र त्यावेळी अचानक त्या खेळाडूच्या अंगावर वीज पडली. वीजेच्या धक्क्याने तो खेळाडू जाग्यावरच पडलेला दिसला. मैदानातील इतर खेळाडू प्रचंड घाबरलेले दिसले.
पाहा व्हिडीओ-
Footballer dies after hitting by lightning in Indonesia😵💔 https://t.co/zBZJkrlHVz
— Abdul Rahman Mashood (@abdulrahmanmash) February 12, 2024
NEW: Footballer (soccer) dead after being struck by lightning during a match in Indonesia pic.twitter.com/PAzxzHKnsA
— Robert D in Tulsa – #PureBlood (@RobertDinTulsa) February 12, 2024
ज्या खेळाडूच्या अंगावर वीज पडली त्याच्याजवळ इतरही खेळाडू पोहोचलेले दिसले. काही खेळाडू वीजेच्या आवाजाने मैदानाच्या बाहेर पळून जाताना दिसले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला असून जाग्यावरच खेळाडूचा मृत्यू झाल्याने नेटकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, फुटबॉल सामना सुरू असताना वीज पडण्याची ही काह पहिलीच वेळ नाही. याआधी सोरिटिन अंडर-13 चषकावेळी पूर्व जावामध्ये एका युवा खेळाडूच्या अंगावर वीज कोसळली होती. मात्र त्याला वेळेत रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं होतं. डिसेंबर 2023 ला ब्राझीलमध्ये फुटबॉल सामन्यावेळी वीज कोसळून एक खेळाडूचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. तर सहा जण जखमी झाले होते.