Weightlifting : इतिहासात प्रथमच! हिमाचल प्रदेशमध्ये फक्त महिला वेटलिफ्टर्स खेळणार, काय आहे विशेष, जाणून घ्या…
टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू, ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारी हर्षदा गरुड आणि 430 लिफ्टर्स सहभागी होतील.
मुंबई : वेटलिफ्टिंगच्या (Weightlifting) इतिहासात प्रथमच मुलींची (girls) लीग आयोजित केली जात आहे. 14 ते 22 जून या कालावधीत हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) नागरोटा बागवान येथे होणाऱ्या या लीगमध्ये फक्त महिला वेटलिफ्टर्स खेळणार असून यामध्ये टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू, ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारी हर्षदा गरुड आणि 430 लिफ्टर्स सहभागी होतील. स्पोर्ट्स इंडिया अंतर्गत महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी ही लीग आयोजित केली जात आहे. वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष सहदेव यादव सांगितलं की, लीगमधील पदक विजेत्यांव्यतिरिक्त पहिल्या आठ महिलांना बक्षिसे दिली जातील. परंतु त्यांचा डोप रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरच रोख रक्कम दिली जाईल.
काय आहेत बक्षिस
ही लीग देखील महत्त्वाची आहे. कारण यामध्ये दाखविलेल्या कामगिरीमुळे महिला लिफ्टर्सचे राष्ट्रीय रँकिंग तर तयार होईलच शिवाय त्यात दाखवलेल्या कामगिरीच्या आधारे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय शिबिरातही स्थान मिळेल. विजेत्यास 20, रौप्य विजेत्यास 15 आणि कांस्य विजेत्यास 12 हजार रुपये दिले जातील. ज्युनियरच्या विजेत्याला 15 तर युथच्या विजेत्याला 12 हजार रुपये मिळतील.
प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा
स्पोर्ट्स इंडिया अंतर्गत महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी ही लीग आयोजित केली जात आहे. वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष सहदेव यादव सांगितलं की, लीगमधील पदक विजेत्यांव्यतिरिक्त पहिल्या आठ महिलांना बक्षिसे दिली जातील. परंतु त्यांचा डोप रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरच रोख रक्कम दिली जाईल.
कधी होणार स्पर्धा?
वेटलिफ्टिंगच्या इतिहासात प्रथमच मुलींची लीग आयोजित केली जात आहे. 14 ते 22 जून या कालावधीत हिमाचल प्रदेशातील नागरोटा बागवान येथे होणाऱ्या या लीगमध्ये फक्त महिला वेटलिफ्टर्स खेळणार असून यामध्ये टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू, ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारी हर्षदा गरुड आणि 430 लिफ्टर्स सहभागी होतील.