गुज्जरवाल ते युरोप! फुटबॉलसाठी भव्य व्यासपीठ, गुरलीन आणि जपलीनचा उल्लेखनीय प्रवास
टीव्ही9 नेटवर्कच्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस फुटबॉल मोहिमेने देशभरातील अविश्वसनीय प्रतिभा शोधून काढली. पंजाबच्या गुज्जरवाल गावातील जपलीन कौर आणि गुरलीन कौर या दोन मुलींची सर्व अडचणींवर मात करत आपली प्रतिभा दाखवली आहे. आता त्यांना ऑस्ट्रियामध्ये प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

टीव्ही 9 नेटवर्कच्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. भारतीय क्रीडा इतिहासातील सर्वात मोठ्या टॅलेंट हंट कार्यक्रमात लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि त्यांची फुटबॉलमधील क्षमता दाखवली. देशभरातील आठ स्काउटिंग कॅम्पमध्ये सुमारे 50 हजार नोंदणीसह 16 हजार शाळांमधील मुलांनी मेगा-हंटमध्ये भाग घेऊन फुटबॉल क्रांतीमध्ये सामील झाले. टीव्ही 9 नेटवर्कच्या या अनोख्या फुटबॉल कार्यक्रमाने भारतीय क्रीडा क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे.नोंदणी प्रक्रियेनंतर जवळपास 3 हजार मुली आणि 7 हजार मुलांची निवड करण्यात आली होती. पण देशभरातील कठोर चाचण्यांच्या मालिकेनंतर केवळ 32 जणांना अंतिम फेरीत स्थान मिळाले.
गुरलीन आणि जपलीन कौरचा प्रवास
पंजाब ट्रायल्समधून निवड झालेल्या गुरलीन आणि जपलीन कौर ‘फॅब 32’ चा भाग आहेत. त्यांना ऑस्ट्रियामध्ये सर्वोत्तम खेळाडूंसोबत प्रशिक्षण घेण्यासाठी निवडण्यात आले आहे. पंजाबमधील लुधियानाजवळील गुज्जरवाल गावात राहात असलेल्या गुरलीन आणि जपलीन दोघीही त्यांच्या कारकिर्दीत पुढचे मोठे पाऊल टाकण्यास सज्ज आहेत.
जपलीनने सुरुवातीला फुटबॉलबाबत कधीही विचारही केला नव्हता. तिने टेबल टेनिसने तिचा क्रीडा प्रवास सुरू केला होता. परंतु आयुष्याच्या योजना वेगळ्या असतात. लॉकडाऊन दरम्यान जेव्हा तिच्या गावात फुटबॉल अकादमी उघडली तेव्हा तिने फुटबॉलमध्ये नशीब आजमावले आणि तिच्यातील प्रतिभेला चालना मिळाली. माजी कबड्डी खेळाडू हरजोत सिंग यांना त्यांच्या मुलीची निवडीबद्दल आणि तिच्या कामगिरीचा अभिमान आहे. जपलीनच्या कुटुंबाला खेळाचं वलय आहे. आता जपलीनने फुटबॉलच्या मैदानावर स्वतःची ओळख निर्माण केली.
गोलकीपर म्हणून निवड झालेली गुरलीन एका अतिशय गरीब कुटुंबातून येते. सुरुवातीला तिला तिच्या खेळण्याच्या क्षमतेबद्दल शंका होत्या. पण जेव्हा तिने तिच्या ज्युनियरला पाहिले तेव्हा त्या सर्व शंका दूर झाल्या आणि तिने संधी साधली आणि स्वप्ने पाहू लागली. गुरलीनचे वडील हरप्रीत हे ट्रक ड्रायव्हर आहेत. त्यांना त्यांच्या मुलीच्या कामगिरीबद्दल कळले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रशिक्षक गोली थापा यांना विश्वास आहे की गुरलीन एक चांगली गोलकीपर आहे आणि तिचे भविष्य उज्ज्वल आहे.