Khelo India Youth Games : हरियाणानं पटकावले इंडिया युथ गेम्सचे विजेतेपद, कोणत्या संघाला किती पदके? जाणून घ्या…

दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राच्या खात्यात 45 सुवर्ण, 40 रौप्य आणि 46 कांस्य पदके आहेत.

Khelo India Youth Games : हरियाणानं पटकावले इंडिया युथ गेम्सचे विजेतेपद, कोणत्या संघाला किती पदके? जाणून घ्या...
खेलो इंडिया स्पर्धाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 9:17 AM

नवी दिल्ली : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये (khelo india youth games) पहिल्या दिवसापासून स्पर्धा करणाऱ्या महाराष्ट्राचा (Maharashtra)शेवटच्या दिवशी हरियाणानं (hariyana) पराभव केला. हरियाणाच्या बॉक्सर्सनी अंतिम दिवशी 10 सुवर्णप दकांवर सुवर्णपदक पटकावून खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे विजेते होण्याचा मान मिळविला. हरियाणानं 52 सुवर्णांसह एकूण 137 पदके जिंकली आहेत. तर महाराष्ट्राने 45 सुवर्णांसह 125 पदकांसह दुसरे स्थान पटकावलंय. कर्नाटकचा जलतरणपटू अनिश गौडा याने सर्वाधिक सहा सुवर्णपदके जिंकली. या खेळांमध्ये 4700 खेळाडूंनी 25 स्पर्धांमध्ये भाग घेतलाय. त्यामध्ये 2262 मुलींचा समावेश आहे. शेवटच्या दिवशीही हरियाणानं आपलं वर्चस्व कायम राखलं. बॉक्सिंग स्पर्धांमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकून हरियाणा बॉक्सिंगमध्ये एकंदरीत चॅम्पियन बनला. हरियाणातून, 8 मुली आणि 5 मुले फायनलमध्ये पोहोचले होते. ज्यामध्ये 6 सुवर्ण मुली आणि 4 गोल्ड एंड्सने खेलो इंडिया युथ गेम्स – 2021 च्या चॅम्पियन बनण्याच्या शर्यतीत हरियाणाचं स्थान मजबूत केलंय.

मुलींची बाजी, 6 सुवर्ण

चुणूक दाखवली.45-48 किलो वजनी गटात हरियाणाच्या गीतिकानं उत्तर प्रदेशच्या रागिणी उपाध्यायचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावलंय.  चप्रमाणे 48-50 किलो वजनी गटात हरियाणाच्या तमन्नानं पंजाबच्या सुविधा भगतचा 5-0 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलंय. 52-54 किलो वजनी गटात हरियाणाच्या नेहानं उत्तराखंडच्या आरती धारियाचा 5-0 असा पराभव करत हरियाणाच्या झोळीत सुवर्णपदक पटकावलं. 54-57 किलो वजनी गटात हरियाणाच्या प्रीतीनं पहिल्या फेरीत मणिपूरच्या हुआर्डो ग्रेव्हिया देवीला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. याशिवाय हरियाणाच्या प्रीती दहियानं 57-60 किलो वजनी गटात राजस्थानच्या कल्पनाचा 4-1 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. 66-70 किलो वजनी गटात हरियाणाच्या लशू यादवनं दिल्लीच्या शिवानीचा 5-0 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. याशिवाय हरियाणाच्या नीरू खत्रीनं 50-52 किलो वजनी गटात रौप्यपदक तर हरियाणाच्या मुस्काननं 63-66 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं.

हे सुद्धा वाचा

हरियाणाच्या आशिषने रौप्यपदक पटकावले

63.5 किलो वजनी गटात हरियाणाच्या वंशजने आसामच्या इमदाद हुसेनचा पराभव करून सुवर्ण जिंकले. 71 किलो वजनी गटात हरियाणाच्या हर्षित राठीने चंदीगडच्या आशिष हुडाचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. तसेच 75 किलो वजनी गटात हरियाणाच्या दीपकने महाराष्ट्राच्या कुणाल घोरपडेला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. 80 किलो वजनी गटात हरियाणाच्या विशालने पंजाबच्या अक्ष गर्गचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.तसेच 46-48 किलो वजनी गटात हरियाणाच्या आशिषने रौप्यपदक पटकावले.

 महाराष्ट्राच्या खात्यात 45 सुवर्ण

बॉक्सिंग स्पर्धांमध्ये हरियाणाच्या खेळाडूंनी गोल्डन पंच मारत हरियाणाच्या खात्यात 10 पदकांची भर घातली, त्यामुळे हरियाणाने अर्धशतक झळकावले. हरियाणाकडे 52 सुवर्ण, 39 रौप्य आणि 46 कांस्य पदके असून एकूण 137 पदकांसह ते पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राच्या खात्यात 45 सुवर्ण, 40 रौप्य आणि 46 कांस्य पदके आहेत. कर्नाटकच्या खात्यात 22 सुवर्ण, 17 रौप्य आणि 28 कांस्य पदके आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.