Olympic: हॉकी टीम इंडियाचा ऑलिम्पिकमधील ‘सुवर्ण’ इतिहास, आतापर्यंतची कामगिरी कशी?

Hockey Team India: हॉकी टीम इंडिया पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात खेळण्यासाठी सज्ज आहे. भारतीय हॉकी संघाची या ऑलिम्पिक स्पर्धेत कामगिरी कशी आहे? हॉकी टीमने किती आणि कोणती पदक जिंकली आहेत? जाणून घ्या सर्व इतिहास.

Olympic: हॉकी टीम इंडियाचा ऑलिम्पिकमधील 'सुवर्ण' इतिहास, आतापर्यंतची कामगिरी कशी?
Hockey Team India
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 9:52 PM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालंय. परिस ऑलिम्पिकला 26 जुलैपासून सुरुवात होत आहे. टीम इंडियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाही भारतीय क्रीडाप्रेमींना खेळाडूंकडून त्यापेक्षा भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. भारताने 1900 साली ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत भारताने वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर एकूण 35 विविध पदकं जिंकली आहेत. तसेच टीम इंडियाने हॉकीमध्ये सर्वाधिक 8 मेडल्स पटकावली आहेत. यामध्ये 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकाचां समावेश आहे.

हॉकी टीम इंडियाचा ऑलिम्पिकमधील इतिहास

हॉकी सर्वात जुन्या खेळापैकी एक आहे. क्रिकेट वाटत असला तरी हॉकीच हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. भारतात पहिल्या हॉकी क्लबची स्थापना ही कोलकातात जवळपास 1855 साली झाली. तर हॉकी टीम इंडियाची सुरुवात ही 1925 साली करण्यात आली. हॉकी टीम इंडियाने 1928 साली ऑलिम्पिक पदार्पणातच सुवर्ण पदक पटकावलं. तेव्हा भारतीय संघाने एकूण 5 सामन्यांमध्ये 29 गोल केले होते, त्यापैकी 14 गोल हे दिग्गज मेजर ध्यानचंद यांनी केले होते. त्यानंतर 1928 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी इव्हेंटमध्ये एकूण 9 संघ होते. तेव्हा टीम इंडिया, बेल्जियम, डेनमार्क, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया ए ग्रुपमध्ये होते. टीम इंडियाने तेव्हा अंतिम फेरीत नेदरलँड्सवर विजय मिळवला होता.

सुवर्ण पदकाची हॅटट्रिक

हॉकी टीम इंडियाने ही कामगिरी पुढील 2 ऑलिम्पिकमध्ये कायम राखली आणि सुवर्ण पदकाची हॅटट्रिक केली. हॉकी टीम इंडियाने 1932 आणि 1936 साली गोल्ड मेडल मिळवलं. ऑलिम्पिक 1932 स्पर्धेत टीम इंडियासह जपान आणि अमेरिकेने सहभाग घेतला. टीम इंडियाने तेव्हा अमेरिकेचा 24-1 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवत गोल्ड मेडल जिंकलं होतं. तर 1936 साली फायनलमध्ये जर्मीनीचा 8-1 अशा फरकाने धुव्वा उडवत टीम इंडियाने गोल्ड मेडलची हॅटट्रिक पूर्ण केली.

स्वातंत्र्योत्तर काळात हॉकी टीम इंडियाने उल्लेखनीय कामगिरी केली. भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला. त्यामुळे हॉकी टीम इंडिया विखुरली गेली. भारत 1948 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्वतंत्र राष्ट्र म्हणून सहभागी झाला. तेव्हा हॉकी टीम इंडियाने फायनलमध्ये ग्रेट ब्रिटेनला पराभूत करत चौथ्यांदा सुवर्ण पदक पटकावलं.

hockey team india performance in Olympic

hockey team india performance in Olympic

हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये 1948 च्या लंडन ऑलिम्पिकमधील अव्वल 4 संघांना क्वार्टर फायनलमध्ये थेट प्रवेश देण्यात आला. हॉकी टीम इंडियाचाही यात समावेश होता. टीम इंडियाने फायनलमध्ये नेदरलँड्सवर 6-1 फरकाने मात करत पाचव्यांदा सुवर्ण पदक मिळवलं.

हॉकी टीम इंडियाचा 1956 सालीही दबदबा पाहायला मिळाला. मेलबर्न ऑलिम्पिक फिल्ड हॉकी स्पर्धेत 12 संघ सहभागी होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंडिया-पाकिस्तान आमनेसामने होते. टीम इंडियाने तेव्हा पाकिस्तानला 1-0 ने नमवून सहाव्यांदा गोल्ड मेडल जिंकण्याची कामगिरी केली.

टीम इंडियाने 1960 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतही विजयी घोडदौड कायम ठेवली. मात्र टीम इंडियाला तेव्हा गोल्डऐवजी सिलव्हर मेडलवर समाधान मानावं लागलं. रोम ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियासह, न्यूझीलंड, नेदरलँड्स आणि डेनमार्क हे संघ ए ग्रुपमध्ये होते. टीम इंडियाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले. मात्र फायनलमध्ये पाकिस्तानने टीम इंडियावर मात करत गेल्या पराभवाचा वचपा काढला. मात्र त्यानंतर टीम इंडियाने 1964 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कमबॅक केलं. पाकिस्तानला फायनलमध्ये लोळवत सुवर्ण पदकावर मोहर उमटवत गेल्या पराभवाचा वचपा घेतला आणि हिशोब बरोबर केला.

टीम इंडियाने 1968 च्या मॅक्सिको ऑलिम्पिकमध्येही मेडल पटकावलं. मात्र टीम इंडियाला कांस्य पदकावर समाधान मानवं लागलं. टीम इंडियाचं आव्हान हे फायनलआधीच संपुष्टात आलं. भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. मात्र पश्चिम जर्मनीला पराभूत करत टीम इंडियाने कांस्य पदक निश्चित केलं होतं. त्यानंतर 1972 साली म्यूनिख ऑलिम्पिकमध्येही टीम इंडियाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर 1976 साली मॉन्ट्रियल ऑलिम्पिकमध्ये टीम इंडिया अपयशी राहिली, तेव्हा कोणतही पदक मिळवता आलं नाही. मात्र 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये दणक्यात कमबॅक करत सुवर्ण पदक मिळवलं.

हॉकी टीम इंडियाला 1980 नंतर उतरती कळा लागली. टीम इंडियासाठी पुढील काही वर्षही प्रचंड संघर्षाची राहिली. टीम इंडियाला 1980 नंतर पदकासाठी तब्बल 41 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. टीम इंडियाने 2020 साली टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 41 वर्षांची प्रतिक्षा संपवत अखेर कांस्य पदकाची कमाई केली. मनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली. त्यामुळे आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी टीम इंडिया कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.

हॉकी टीम इंडियाचं वेळापत्रक

दरम्यान टीम इंडिया पॅरिस ऑलिम्पिकमधील मोहिमेची सुरुवात 27 जुलैपासून न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्याने करणार आहे. त्यानंतर 29 ला अर्जेंटीना आणि 30 जुलैला आयर्लंड विरुद्ध सामना होईल. तर 1 ऑगस्टला बेल्जियम आणि 2 ऑगस्टला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना होणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी हॉकी टीम इंडिया : हरमनप्रीत सिंग (कर्णधार), हार्दिक सिंग (उपकर्णधार), पीआर श्रीजेश (गोलकीपर), मनप्रीत सिंग (मिडफिल्डर), जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, सुमित, संजय, राज कुमार पॉल, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद , अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग आणि गुरजंत सिंग.

राखीव खेळाडू: गोलकीपर कृष्ण बहादूर पाठक, मिडफिल्डर नीलकंठ शर्मा आणि बचावपटू जुगराज सिंग.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.