‘मला म्हैस नको, तर…’ सुवर्ण पदक विजेत्या अरशदने सासऱ्याची घेतली फिरकी; बायकोची रिएक्शन व्हायरल
पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं. यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. पण त्याला मिळालेल्या गिफ्टची चर्चा रंगली आहे. सासऱ्याकडून म्हैस भेट मिळाली आणि त्याने एका शोमध्ये त्यावरून फिरकी घेतली. त्यानंतर पत्नीची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
पाकिस्तान सध्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला डावललं जात आहे. दहशतवादाला खतपाणी घातल्याचे वाईट परिणाम भोगावे लागत आहेत. दुसरीकडे, बेरोजगारी आणि इतर घडामोडींमुळे पाकिस्तानची पार वाट लागली आहे. पाकिस्तानी क्रिकेटलाही उतरती कला लागली आहे. असं असताना ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू अरशद नदीमने सुवर्ण पदक मिळवलं आणि सर्वत्र चर्चा रंगली आहे. अरशदच्या कामगिरीमुळे त्याला पाकिस्तानात जिथे तिथे मान मिळत आहे. इतकंच काय नदीमला कोट्यवधी रुपये बक्षिसाच्या रुपाने मिळाले आहेत. तसेच पाकिस्तानी मीडियाही त्याला चांगलं कव्हरेज देत आहे. त्याची मुलाखत घेण्यासाठी त्याच्या घराबाहेर मीडियाची रांग लागली आहे. पण अरशदच्या एका वक्तव्यामुळे पत्नी खूपच नाराज झाली आहे. एका लाईव्ह शोमध्ये अरशद नदीमने आपल्या सासऱ्याने दिलेल्या गिफ्टची खिल्ली उडवली.
अरशद नदीमच्या सासऱ्याने त्याला म्हैस भेट म्हणून दिली. त्यामुळे अरशदने सासऱ्याची फिरकी घेतली. इतके श्रीमंत असून मला फक्त एक म्हैस भेट दिली. ते पाच सहा एकर जमीन देऊ शकले असते. लाईव्ह शोमध्ये जेव्हा अरशद नदीम असं वक्तव्य करत होता. तेव्हा त्याच्या पत्नीचा चेहरा गंभीर झाला होता. त्याच्या या वक्तव्यावर एकदाही हसली नाही. दुसरीकडे, नदीम आणि अँकर यावर जोरजोरात हसत होते.
Arshad Nadeem’s reaction on his father gifting him a buffalo after winning the Gold medal 😂😂😂
He wanted 5-6 acre plot from his father-in-law and not a buffalo. Man, he’s so simple 😭❤️ #Paris2024 pic.twitter.com/EzRv68GyAl
— Farid Khan (@_FaridKhan) August 16, 2024
अरशद नदीमच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत आहेत. पण या शोमध्ये अरशदने गमतीने ते सांगितलं होतं. पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक अंतिम फेरीत 92.97 मीटर अंतर कापून ऑलिम्पिक स्पर्धेत विक्रम रचला. त्याने एकदा नव्हे तर दोनदा 90 मीटरचा टप्पा पार केला. अरशद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गतविजेत्या सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचा पराभव केला.