IND vs PAK | आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानवर शानदार विजय
Asia Cup 2023 India vs Pakistan | क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर अखेरच्या क्षणी थरारक विजय मिळवला आहे.
मुंबई | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील आशिया कप 2023 स्पर्धेतील तिसरा सामना हा पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आलाय. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 पॉइंट देण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने चिर प्रतिद्ंवदी पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय. टीम इंडियाने या विजयासह मेन्स हॉकी 5 आशिया कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. मेन्स हॉकी 5 आशिया कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने होते. या सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 गोल केले.
सामना बरोबरीत पोहचला अन्
पाकिस्तान आणि टीम इंडिया दोन्ही संघांचे 4-4 गोल झाले. त्यामुळे सामना बरोबरीत पोहचला. त्यामुळे सामन्याचा निकाल हा शूटआऊटमध्ये लागला. टीम इंडियाने शूटआऊटमध्ये पाकिस्तानवर मात केली. टीम इंडियाने पाकिस्तानला नमवत हॉकी 5 वर्ल्ड कप 2024 मध्ये धडक मारली. टीम इंडियाकडून मोहम्मद राहिल याने (19 आणि 26) जुगराज सिंह (7) आणि मनिंदर सिंह याने 10 व्या मिनिटाला निर्धारित वेळेत गोल ठोकला. तर गुरजोत सिंह आणि मनिंदर सिंह या दोघांनी शूटआऊटमध्ये निर्णायक क्षणी गोल केले.
टीम इंडियाचा थरारक विजय
Redemption is ours 😍
India come back to draw the game and secure an emphatic victory against Pakistan in Penalty Shootouts.#HockeyIndia #IndiaKaGame #Hockey5s pic.twitter.com/at9cAPirtI
— Hockey India (@TheHockeyIndia) September 2, 2023
तर पाकिस्तान हॉकी टीमकडूनन निर्धारित वेळेत अब्दुल रहमान याने (5), कॅप्टन अब्दुल राणा (13), जिकारिया हयात (14) आणि अर्शद लियाकत याने (19) मिनिटाला गोल केलं. याआधी हॉकी टीम इंडिया विरुद्ध मलेशिया यांच्यात सेमी फायनल मॅच झाली. टीम इंडियाने या सामन्यात मलेशियावर 10-4 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली होती. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्ताननेही ओमानवर मात केली. पाकिस्तानने ओमानचा 7-3 असा धुव्वा उडवला. अशा प्रकारे दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला, मात्र टीम इंडियाने बाजी मारली.
दरम्यान टीम इंडियाला स्पर्धेतील एलीट पूलमधील साखळी सामन्यात पाकिस्तानने पराभूत केलं. पाकिस्तानने टीम इंडियावर 4-5 असा विजय मिळवला .
टीम इंडियाकडून सेमी फायनलमध्ये मोहम्मद राहिल याने (9,16,24 आणि 28 मिनिट) मनिंदर सिंह (2 मिनिट), पवन राजभर (13 मिनिट), सुखविंदर (21 मिनिट) दिप्सन टिर्की (22 मिनिट), जुगराज सिंह (23 मिनिट) आणि गुरजोत सिंह याने (29 मिनिट) गोल केलं. तर मलेशियाकडून कॅप्टन इस्माईल आसिया अबू (4 मिनिट), अकहिमुल्लाह अनवर (7,19 मिनिट) आणि मोहम्मद दिन (19 व्या मिनिट) गोल केला.