भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची निवृत्ती, अशी राहिली आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी

भारताची दिग्गज जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने सोमवारी आपल्या कारकिर्दिला पूर्णविराम दिला आहे. दीपा कर्माकर रियो ऑलिम्पिक 2016 स्पर्धेत चर्चेत आली होती. अवघ्या काही गुणांनी तिचं कांस्य पदक हुकलं होतं. ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय असल्याचा मान तिला मिळाला होता.

भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची निवृत्ती, अशी राहिली आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी
Image Credit source: (इन्स्टाग्राम/दिपा कर्माकर)
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 6:32 PM

भारतीय स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने आपल्या कारकिर्द थांबवत असल्याचं जाहीर केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही घोषणा केली आहे. दीपा कर्माकर याच वर्षी आशियाई चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली होती. तसेच रियो ऑलिम्पिक 2016 स्पर्धेत तिचं कांस्य पदक अवघ्या काही गुणांनी हुकलं होतं. फक्त 0.15 गुण कमी पडले आणि तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. दीपा कर्माकरने आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जाहीर केलं आहे की, ‘खूप विचारपूर्वक आणि चिंतन करून मी प्रोफेशनल जिम्नॅस्टिकमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. पण मला वाटतं ही योग्य वेळ आहे. जोपर्यंत मला आठवते की, जिम्नॅस्टिक हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग राहिला आहे. मी प्रत्येक क्षण पुरेपूर जगली आहे. प्रत्येक क्षणासाठी मी कृतज्ञ आहे. ‘ वयाच्या 31 व्या वर्षी दीपाने निवृत्ती जाहीर केली आहे.

दीपा कर्माकरने पुढे लिहिलं की, ‘मला आठवते ती पाच वर्षांची दीपा..तिला स्पष्ट सांगण्यात आलं होतं की सपाट पायांमुळे कधीच जिम्नॅस्ट होऊ शकत नाही. पण आज मला माझ्या कामगिरीचा अभिमान वाटतो. जागतिक पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करणं आणि पदकं जिंकणे. सर्वात महत्त्वाच म्हणजे रियो ऑलिम्पिकमध्ये प्रोड्युनोव्हा व्हॉल्टविरुद्ध केलेली कामगिरी माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण ठरला आहे. आज दीपाला पाहून खूप आनंद वाटतो कारण तिच्यात स्वप्न पाहण्याची हिंमत होती.’

‘आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप ताश्कंद हा एक टर्निंग पॉईंट होता, कारण तोपर्यंत मला वाटले की मी माझ्या शरीराला आणखी पुढे ढकलू शकेन.पण कधीकधी आपले शरीर आपल्याला सांगते की ही विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. पण मन अजूनही सहमत नाही. मी निवृत्त होत असले तरी माझा जिम्नॅस्टिकशी असलेला संबंध कधीही तुटणार नाही. मला या खेळाला काहीतरी परत द्यायचे आहे. कदाचित मार्गदर्शन, प्रशिक्षण किंवा माझ्यासारख्या इतर मुलींना पाठिंबा देईन.’, असंही दीपा कर्माकरने पुढे लिहिलं आहे.

'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज.
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'.
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार.
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या.
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?.
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?.
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?.
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले..
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले...
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा.