Vinesh Phogat प्रकरणाच्या निकालाची प्रतिक्षा पुन्हा लांबली, आता निर्णय केव्हा?

Vinesh Phogat Case Result Update: भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीच्या अपात्रेच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या आता काय झालं?

Vinesh Phogat प्रकरणाच्या निकालाची प्रतिक्षा पुन्हा लांबली, आता निर्णय केव्हा?
wrestler vinesh phogatImage Credit source: OlympicKhel x Account
Follow us
| Updated on: Aug 11, 2024 | 7:00 PM

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणाच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अपात्रप्रकरणी आज रविवारी 11 ऑगस्टला निकाल येणं अपेक्षित होतं. या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागून होतं. मात्र आता नवी अपडेट समोर आली आहे. अपात्रतेप्रकरणी आजही निकाल येणार नाही. त्यामुळे भारतीयांची प्रतिक्षा आणखी लांबली आहे. विनेशला अंतिम सामन्यापूर्वी वाढीव वजनामुळे अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे विनेशने क्रीडा लवादात धाव घेतली होती. आता त्यानंतर तब्बल दुसऱ्यांदा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे भारतीयांना आणखी काही तास रौप्य पदकाबाबतच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

नक्की प्रकरण काय?

महिला कुस्तीपटू विनेश फोगाट ही पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत 50 किलो वजनी गटात सहभागी झाली. तिने मंगळवारी सलग 3 सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे विनेशने भारतासाठी रौप्य पदक निश्चित केलं. तर सुवर्ण पदकासाठीचा सामना हा 7 ऑगस्ट रोजी पार पडणार होता. मात्र अंतिम सामन्याआधी विनेशचं प्रमाणापेक्षा 100 ग्राम वजन जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं. विनेशने त्यानंतर सीएएस अर्थात कोर्ट ऑफ अबिट्रेशन ऑफ स्पोर्ट या क्रीडा लवादात अपात्रेच्या निर्णयाविरोधात धाव घेतली. सुवर्ण पदकाचा सामना खेळण्याची विनंती फेटाळल्यानंतर विनेशने संयुक्तरित्या रौप्य पदक देण्याची मागणी विनेशची आहे.

3 तास सुनावणी, 2 वेळा निर्णय लांबणीवर

हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या निष्णात कायदेपंडितांनी 9 ऑगस्ट रोजी क्रीडा लवादात विनेशची बाजू मांडली. विनेशनेही व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली बाजू सांगितली. जवळपास 3 तास हा युक्तीवाद चालला. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी निकाल येणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र 10ऐवजी 11 ऑगस्टला निकाल येणार असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणी नवीन तारीख समोर आली आहे. आता या प्रकरणात 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निर्णय येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

निकाल पुन्हा लांबवणीवर

भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेची सांगता

दरम्यान भारताच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील मोहिमेची सांगता झाली आहे. भारताला या स्पर्धेत एकूण 6 पदकं मिळवण्यात यश आलं. भारताने 5 कांस्य आणि 1 रौप्य पदक मिळवलं. मनू भाकर ही यशस्वी खेळाडू ठरली. नेमबाजीत मनू भाकर हीने वैयक्तिक आणि मिश्र दुहेरीत सरबज्योत सिंह याच्यासह कांस्य पदकाची कमाई केली. कोल्हापुरचा नेमबाज स्वपनील कुसाळे यानेही बॉन्झ मेडल मिळवलं. हॉकी इंडियाने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदकाला गवसणी घातली. भालाफेरीत नीरज चोप्राने भारताला एकमेव रौप्य मिळवून दिलं. तर अमन सेहरावत याने यंदा कुस्तीतील कांस्य मिळवून देत गेल्या 16 वर्षांची परंपरा कायम ठेवली.

'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.