भालाफेकपटू नीरज चोप्राला अंतिम फेरीत या चार खेळाडूंचं असेल आव्हान, जाणून घ्या सुवर्ण पदकासाठीचे नियम

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेप्रमाणेच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राकडून अपेक्षा आहे. नीरजने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली होती. आता त्या दिशेने पुन्हा एकदा कूच केली आहे. पण पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याला चार खेळाडूंचं तगडं आव्हान असेल. जाणून घ्या सर्वकाही

भालाफेकपटू नीरज चोप्राला अंतिम फेरीत या चार खेळाडूंचं असेल आव्हान, जाणून घ्या सुवर्ण पदकासाठीचे नियम
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 9:58 PM

भालाफेकपटू नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. मागच्या चार वर्षांच्या कालावधीत नीरज चोप्राने यशाचे अनेक पल्ले गाठले आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिपपासून डायमंड लीगपर्यंत जेतेपद मिळवलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याच्याकडून अपेक्षा आहेत. या स्पर्धेपूर्वी चाहत्यांना त्याची चिंता लागून होती. कारण दुखापतीनंतर पुन्हा एकदा मैदानात परतला आहे. पण पात्रता फेरीतच त्याने आपली छाप सोडली आणि एक फेकीतच फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. नीरजने पहिल्या प्रयत्नात भाला 89.34 मीटर लांब फेकला आणि अंतिम फेरी गाठली आहे. पात्रता फेरीत नीरज चोप्रा अव्वल स्थानी राहिला. पण गोल्ड पदकासाठी त्याची लढाई सोपी नाही. कारण चार स्पर्धकांचं त्याला तगडं आव्हान असणार आहे.

पात्रता फेरीत अ आणि ब असे दोन गट पडले होते. प्रत्येक गटात 15 खेळाडूंनी भाग घेतला होता. यात थेट अंतिम फेरी गाठण्यासाठी 84 मीटर फेकी करणं आवश्यक असतं. दोन्ही गटातून एकूण 12 स्पर्धकांना अंतिम फेरीत स्थान दिलं जातं. नीरज चोप्राने 89.34 मीटर भाला लांब फेकत थेट अंतिम फेरी गठली. त्यानंतर अँडरसन पीटर्सने 88.63 मीटर लांब भाला फेकला. आता या स्पर्धकाची सर्वात जास्त भीती नीरजला असणार आहे. कारण त्याने आपल्या करिअरमध्ये 93.07 लांब भाला फेकला आहे.

तिसऱ्या क्रमांकावर जर्मनीचा ज्युलियन वेबर राहिला. त्याने 87.76 मीटर लांब भाला फेकला. चौथ्या स्थानावर पाकिस्तानचा अर्शद नदीम राहिला त्याने 86.59 लांब भाला फेकला. वेबर आणि नदीम नीजरला गेल्या काही स्पर्धांमध्ये तगडं आव्हान देत आहेत. त्यामुळे या दोघांचं आव्हानही असणार आहे.वेबरची सर्वोत्तम फेकी ही 89.54 आणि नदीमची 90.18 राहिली आहे.

काय आहे अंतिम फेरीसाठी नियम?

भालाफेक स्पर्धेत एकूण 12 खेळाडू भाग घेतात. अंतिम सामन्यात दोन फेऱ्या असतात. पहिल्या फेरीत प्रत्येक खेळाडूला भाला फेकण्याच्या तीन संधी मिळतात. यातून टॉप 6 स्पर्धक पुढच्या फेरीत निवडले जातात. या फेरीतही प्रत्येकाला तीन संधी दिल्या जातात. या तीन फेकीत सर्वोत्तम तीन जणांची निवड केली जाईल. बेरजेनुसार सुवर्ण, रजत आणि ब्रॉन्झ पदक दिलं जाईल. भालाफेकीसाठी एका ट्रॅकवर धावत जात भाला फेकावा लागतो. यावेळी डेडलाईन डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. चुकून डेडलाईनला पाय स्पर्श झाला किंवा पार केली तर फॉल ठरतो.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.