Formula 2 Race | जेहान दारुवालाची ऐतिहासिक कामगिरी, फॉर्म्युला 2 रेस जिंकणारा पहिला भारतीय
शूमाकर आणि टीकटुमला पछाडत जेहानने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
बहरीन : फॉर्म्युला 2 कार रेसिंग (Formula 2) स्पर्धेत दिग्गज खेळाडूंमध्ये सहभाग घेणं ही भारतीयांसाठी सोप्पी गोष्ट नाही. मात्र भारताच्या एका खेळाडूने चक्क ही फॉर्म्यूला 2 रेस जिंकण्याची कामगिरी केली आहे. भारतीय ड्रायव्हर जेहान दारुवाला (Jehan Daruvala) याने ही कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्याने ही कामगिरी करुन दाखवली आहे. जेहानने साखिर ग्रँड प्रीक्स दरम्यान ( Sakhir Grand Prix) ही कामगिरी केली. जेहान यासह अशी कामिगिरी करणारा एकमेव भारतीय ठरला आहे. Jehan Daruwala created history, became the first Indian to win a Formula-2 race
फॉर्म्युला 2 चॅम्पियन मिक शूमाकर आणि डॅनियल टिकटुम यांच्याविरोधात रंगतदार सामन्यात जेहान सत्रातील अंतिम फॉर्म्युला 1 ग्रॅंड प्रीक्सच्या सपोर्ट स्पर्धेत आघाडीवर राहिला. जेहान रेयो रेसिंससाठी ड्रायव्हिंग करत होता. जेहानने ग्रिडवर दुसऱ्या क्रमांकावर सुरुवात केली. यासह तो डॅनियल टिकटुमच्या सोबत होता. टीकटुमने जेहानला पछाडण्याचं प्रयत्न केला. यामुळे शुमाकर या दोघांच्या पुढे निघाला.
मात्र जेहानने संयम सोडला नाही. जेहानने संयम राखत आपल्या कारकिर्दीतील पहिलीवहिली फॉर्म्युला टु रेस स्पर्धा जिंकली. जेहानचा जपानी पार्टनर युकी सुनोडा दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अवघ्या 3.5 सेंकंदामुळे तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर टिकटुमने तिसरा क्रमांक पटकावला.
विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया
“ही स्पर्धा जिंकल्यानंतर जेहानने पहिली प्रतिक्रिया दिली. मला भारतातल्या लोकांना हे सिद्ध करायचे होते की आमच्याकडे युरोपमधील ड्रायव्हर्ससारख्या सुविधा नाहीत. तरी आपण कठोर परिश्रम करता तेव्हा ग्रीडच्या वळणावर तुम्ही चांगले आव्हान देऊ शकता”, असं जेहान म्हणाला.
संबंधित बातम्या :
Jehan Daruwala created history, became the first Indian to win a Formula-2 race