KHO KHO WC : भारताने साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात भुटानला लोळवलं, 71-34 मिळवला विजय
खो खो वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच आहे. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात भुटानला नमवून जेतेपदाच्या दिशेने एक एक पाऊल टाकलं आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत टीम इंडियाकडून फार अपेक्षा आहेत.
खो खो वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत भारताने एकही सामना न गमवता उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि भुटान यांच्यात झाला. या सामन्यात सुरुवातीला भुटानने चांगला खेळ केला. पण त्यानंतर भारताने भुटानला पुन्हा संधी दिलीच नाही. भारताने अटॅक करताना 38 गुण मिळवले. पण डिफेंसमध्ये भुटानला चांगलंच झुंजवलं. कारण या दुसऱ्या डावात भारताने फक्त 18 गुणच दिले. त्यामुळे दुसऱ्या डावात भारताकडे 24 गुणांची आघाडी होती. तिसऱ्या डावात भारताने यात आणखी 38 गुणांची कमाई केली. त्यामुळे तिसऱ्या डावाअखेर भारताकडे 62 गुणांची आघाडी होती. शेवटच्या सात मिनिटात 62 धावांची आघाडी मोडायची म्हणजेच भारताच्या 21 बॅच बाद करणं गरजेचं होतं. ते काही भुटानला शक्य झालं नाही. फक्त 16 गुण भुटानला मिळवता आले. त्यातही भारताने बेस्ट डिफेंस करत 1 गुण मिळवला होता. 28 मिनिटांचा खेळ संपला तेव्हा भारताने हा सामना 71-34 च्या फरकाने जिंकला. आता भारताच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना शुक्रवारी रात्री 8 वाजता होणार आहे.
साखळी फेरीत भारताने चार पैकी चारही सामने जिंकले. यासह गट अ मध्ये भारताच्या पारड्यात 12 गुण पडले असून टॉपला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर नेपाळ असून 9 गुण आहेत. त्यामुळे भारत आणि नेपाळ या गटातून उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर भूटान, पेरू आणि ब्राझील या स्पर्धेतून आऊट झाले आहेत. दरम्यान, भूटानविरुद्धच्या सामन्यात अटॅकसाठी भुटानच्या चोकी दोरजीला सन्मानित करण्यात आलं. डिफेंसाठी भारताच्या निखिल कुमार याला गौरविण्यात आलं. तर सामनावीराचा पुरस्कार सुयश गर्गटेला मिळाला.
𝐀𝐧𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐝𝐚𝐲, 𝐚𝐧𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐰𝐢𝐧 𝐟𝐨𝐫 𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭 🇮🇳 👏
With back-to-back victories, they’re all set to bring their A-game to the Quarters. 💪#KhoKhoWorldCup #TheWorldGoesKho #Khommunity #KhoKho #KKWCMen #KKWC2025
— Kho Kho World Cup India 2025 (@Kkwcindia) January 16, 2025
भारतीय पुरुष संघ: प्रतिक वाईकर (कर्णधार), प्रबाणी साबर, मेहुल, सचिन भार्गो, सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिव पोथीर रेड्डी, आदित्य गणपुले, गौथम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि व्ही., सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस. रोकेसन सिंग