KHO KHO WC : भारतीय महिला संघाने मलेशियाला 100-20 ने नमवलं, उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशशी सामना
खो खो वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारताने सलग तिसरा विजय मिळवला आहे. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात मलेशियाला पराभूत केलं. या सामन्यात भारताने मलेशियाला 100-20 या फरकाने पराभूत केलं. अटॅक आणि डिफेंस या दोन्ही स्तरावर टीम इंडिया सरस ठरली.
खो खो वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने विजयी घोडदौड कायम ठेवली. तिसऱ्या सामन्यात मलेशियाला अक्षरश: लोळवलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार प्रियांका इंगलेने डिफेंस करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात सहा ड्रीम गुण मिळवले आणि भारताने पहिल्याच डावात पकड मिळवणार हे दाखवून दिलं. दुसऱ्या डावाच भारताने अटॅक करत 38 गुण मिळवले. तिसऱ्या डावात भारताने पुन्हा एकदा 4 ड्रिम गुण मिळवले. तर मलेशियाच्या खात्यात फक्त 14 गुण आले. चौथ्या डावातही भारताने मलेशियाचा डिफेंस मोडून काढला. एकही ड्रीम गुण दिला नाही. इतकंच काय तर जोरदार अटॅक करत 52 गुणांची कमाई केली. त्यामुळे भारताने खूपच मोठा फरक केला . भारताने मलेशियाला 100-20 च्या फरकाने पराभूत केलं. भारताने हा सामना 80 गुणांच्या आघाडीने जिंकला. मलेशिया या पराभवामुळे स्पर्धेतून बाद झाला आहे. या सामन्यात रेश्मा राठोडला तिच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.
भारताचे साखळी फेरीतील सर्व सामने संपले आहेत. आता भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशशी भिडणार आहे. टीम इंडियाची या स्पर्धेतील कामगिरी पाहता जेतेपदापासून रोखणं कठीण आहे असंच दिसत आहे. आता बाद फेरीत भारताने अशीच कामगिरी ही अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.
🏆 खो-खो वर्ल्ड कप 2025
भारतीय महिला टीम ने शानदार प्रदर्शन करते हुए मलेशिया को 100-20 के बड़े अंतर से हराया! 🇮🇳🔥
इस जीत के लिए टीम को बधाई! 🎉 #KhoKhoWorldCup #TeamIndia #Victory #IndiaVsMalaysia #KhoKho #KhoKho2025 #TheWorldGoesKho #KKWC2025@IndiaSports @Media_SAI… pic.twitter.com/LsG961zaNg
— Doordarshan Sports (@ddsportschannel) January 16, 2025
भारतीय महिला संघ: प्रियांका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर, सुभाषश्री सिंग, मगाई माझी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनू, मोनिका, नाझिया बीबी