Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुस्तीपटू विनेश फोगाट खोटं बोलली? पॅरिस ऑलिम्पिक आणि पीटी ऊषाबाबत हरीश साळवेंच्या दाव्याने खळबळ

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरेल्या विनेश फोगाटबाबत आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. भारत सरकारने अपात्र ठरल्यानंतर मदत केली नाही असा आरोप विनेशने केला होता. पण हरीश साळवेंच्या खुलाशानंतर खळबळ उडाली आहे. हरीश साळवेंनी विनेशचे आरोप फेटाळून लावले आहेत.

कुस्तीपटू विनेश फोगाट खोटं बोलली? पॅरिस ऑलिम्पिक आणि पीटी ऊषाबाबत हरीश साळवेंच्या दाव्याने खळबळ
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 5:28 PM

पॅरिस ऑलिम्पिकमधील कुस्तीपटू विनेश फोगाटचं अपात्र ठरणं कोणीच विसरू शकत नाही. विनेश फोगाट सुवर्ण पदकाच्या वेशीवर उभी असताना अचानक घडामोडी घडल्या आणि एका रात्रीत अपात्र ठरली. 50 किलो वजनी गटापेक्षा तिचं वजन 100 ग्रॅम अधिक भरल्याने अपात्र ठरली. त्यानंतर आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. भारत सरकारने जाणीवपूर्वक मदत करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप विनेश फोगाटने केला होता. तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्षा पीटी ऊषा फक्त फोटो काढण्यासठी तिथे आल्याचा आरोप केला होता. विनेश फोगाटचे हे आरोपी भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी चुकीचे असल्याचं सांगितलं आहे. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (सीएएस) मध्ये विनेशची बाजू हरीश साळवे यांनी मांडली होती. त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली त्यात त्यांनी भारत सरकारची यात कोणतीच भूमिका नसल्याचं सांगितलं. कारण भारतीय ऑलिम्पिक संघटनेला सरकारपासून वेगळं आणि स्वतंत्रपणे काम करावं लागतं. जर सरकारने हस्तक्षेप केला तर संघटना बाहेर केली जाते.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सचं दार ठोठावलं होतं. पण कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचं म्हणणं योग्य असल्याचं सांगत विनेश विरुद्ध निकाल दिला. आता हरीश साळवेंनी दावा केला आहे की, भारतीय ऑलिम्पिक संघटना या विरोधात स्वीस कोर्टात आव्हान देणार होती. पण विनेशने तसं करण्यास नकार दिला. हरीश साळवेंच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. विनेशवर आता खोटं बोलल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, हरियाणात 5 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाट काँग्रेस पक्षाकडून रिंगणात उतरली आहे. काँग्रेसने तिला जुलाना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे.यावेळी प्रचार करताना भाषणात विनेशने भारत सरकार आणि पीटी ऊषा यांच्यावर गंभीर आरोप केले होते.पॅरिसमध्ये आजारी पडल्यानंतर पीटी ऊषा भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी विना परवानगी घेत फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले असा अरोप केला होता.

विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ
विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ.
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी.
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर.
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.