फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी! मेस्सी अर्जेंटिना संघासोबत भारतात येणार, कधी-कुठे सामना जाणून घ्या

भारतात क्रिकेटव्यतिरिक्त फुटबॉलचा एक मोठा चाहता वर्ग आहे. फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान ही क्रेझ पाहायला मिळाली आहे. वर्ल्डकपचा अंतिम सामन्यावेळी तर भारतातून सर्वाधिक युजर्स लाईव्ह असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे युरोपियन फुटबॉल क्लबच्या नजरा भारताकडे वळल्या आहेत. असं असताना मेस्सी भारतात फुटबॉल खेळणं ही फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.

फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी! मेस्सी अर्जेंटिना संघासोबत भारतात येणार, कधी-कुठे सामना जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 5:37 PM

स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी याचे अर्जेंटिनात जितके चाहते आहेत, त्यापेक्षा दुप्पट चाहते भारतात आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतात ही क्रेझ पाहायला मिळाली आहे. 2022 मध्ये पार पडलेल्या फुटबॉलच्या अंतिम फेरीत ही क्रेझ पाहायला मिळाली. अर्जेंटिनाने अंतिम सामना जिंकल्यानंतर त्याचा जल्लोष अर्जेंटिना इतकाच भारतात केला गेला. असं असताना भारतातील लियोनल मेस्सीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अर्जेंटिनाचा हा स्टार फुटबॉलपटू पुढच्या वर्षी भारतात येणार आहे. हो, तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. वर्ल्ड चॅम्पियन संघाचा कर्णधार कोणत्या कार्यक्रमासाठी नाही तर सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यावेळी फुटबॉल चाहत्यांना दोन सामने पाहण्याची अनुभूती मिळणार आहे. मेस्सी 11 वर्षानंतर भारतात येणार आहे. तसेच केरळमध्ये दोन फ्रेंडली सामने खेळणार आहे.

11 वर्षांपूर्वी मेस्सी भारतात आला होता. तेव्हा कोलकात्याच्या साल्ट लेक स्टेडियमममध्ये आंतरराष्ट्रीय फ्रेंडली सामना खेळला होता. यावेळी वेनेज्युएला संघ समोर होता. या सामन्यात एकही गोल करता आला नव्हता. पण तेव्हाही मेस्सीची क्रेझ कायम होती. आता पुन्ही ती क्रेझ फुटबॉलप्रेमींना अनुभवता येणार आहे. केरळचे क्रीडामंत्री व्ही अब्दुराहिमान यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘हा सामना केरळ सरकारच्या अधिपत्याखाली खेळला जाईल. या हाय प्रोफाईल फुटबॉल स्पर्धेचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे.’

अर्जेंटिना विरुद्धचा सामना कोच्चित होण्याची शक्यता आहे. कारण मेस्सी खेळणार असल्याने हा सामना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने फुटबॉलप्रेमी येणार यात शंका नाही. पण हा सामना नववर्षात कधी होणार आहे याबाबत अधिकृत तारीख समोर आलेली नाही. तसेच अर्जेंटिना विरुद्ध कोणता संघ खेळणार याबाबतही येत्या काही दिवसात घोषणा केली जाईल. दोन फ्रेंडली सामने असून भारतीय क्रीडाप्रेमींसाठी एक वेगळीच अनुभूती असणार आहे. दरम्यान, भारतीय संघ 2026 फीफा वर्ल्डकपसाठी पात्र ठरला नाही. आशियाई देशातील पात्रता फेरीत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.