Maharashtra Football Cup | फ्रान्सिस अॅग्नेल संघाची विभागवार फेरीत धडक, पुढील सामना केव्हा?
उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे ऑल सेंट्स स्कूल भिवंडी येथे करण्यात आलं होतं. या अंतिम सामन्यात फ्रान्सिस अॅग्नेलने रेज स्कूलवर 7-3 अशा फरकाने विजय मिळवला.
मुंबई : राज्यात सर्वत्र सध्या महाराष्ट्र फुटबॉल स्पर्धेची चर्चा पाहायला मिळतेय. राज्यात महाराष्ट्र फुटबॉल स्पर्धा सुरु आहे. या 14 वर्षाखालील महाराष्ट्र फुटबॉल स्पर्धेत दररोज विभागवार सामने होत आहेत. अनेक सामने हे रंगतदार आणि चुरशीचे होत आहेत.स्पर्धा जशीजशी पुढे जातेय, त्यानुसार सामन्यात ही तितकीच रंगत येत आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात फ्रान्सिस अॅग्नेल वाशी विरुद्ध रेज स्कूल भिवंडी यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात फ्रान्सिस अॅग्नेलने रेज स्कूलवर एकतर्फी विजय मिळवला.
उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे ऑल सेंट्स स्कूल भिवंडी येथे करण्यात आलं होतं. या अंतिम सामन्यात फ्रान्सिस अॅग्नेलने रेज स्कूलवर 7-3 अशा फरकाने विजय मिळवला. फ्रान्सिस अॅग्नेल टीम या विजयासह मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
मुंबई विभागीय स्पर्धेचं आयोजन हे 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी फ्रान्सिस अॅग्नेल स्पोर्ट्स कॉम्पेलक्स वाशी, नवी मुंबई इथे करण्यात आलं आहे.
स्पर्धेचा उद्देश काय?
राज्याच्या वेगवेगळ्या भागात जिल्हा स्तरावर या स्पर्धा सुरु आहेत. महाराष्ट्राच्या मातीतून उत्तम फुटबॉलपटू घडवणं हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एक विजेता संघ निवडला जाणार आहे. विजेत्या टीमची दुसऱ्या जिल्ह्याच्या टीम बरोबर मॅच होईल. हा या स्पर्धेचा दुसरा टप्पा असणार आहे.
20 फुटबॉलपटूंना जर्मनीला जाण्याची संधी
या स्पर्धेत सर्वोत्तम खेळ दाखवणाऱ्या 20 फुटबॉलपटूंना जर्मनीला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. बार्यन म्युनिच क्लबमध्ये महाराष्ट्रातील या खेळाडूंना ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
या संधी मिळणार
राज्यातील उदयोन्मुख फुटबॉल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने पाहण्याची, सराव करण्याची आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसोबत कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे. जर्मनीच्या विविध फुटबॉल क्लबसोबत या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल.