Neeraj Chopra Javelin Throw | नीरज चोप्रा वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनलमध्ये, पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीटही कन्फर्म
Neeraj Chopra Javelin Throw World Championships 2023 | नीरज चोप्रा याचं गेल्या वर्षी वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनलमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. मात्र आता नीरजकडे ती संधी चालून आली आहे.
बुडापेस्ट | गोल्डन बॉय अशी ओळख असलेल्या नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा धमाका केला आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याने डबल धमाका केला आहे. नीरजने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये ठसा उमटवला आहे. नीरजने आपल्या पहिल्याच थ्रोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बुडापेस्ट इथे वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप क्वालिफिकेशन राऊंड सुरु आहे. नीरजने या पात्रता फेरीत धमाका करत थेट फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. इतकंच नाही, नीरजने आगामी ऑलिम्पिकचंही तिकीट कन्फर्म केलं आहे.
नीरज चोप्रा याचा डबल धमाल
पुढील ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये पॅरिस इथे होणार आहे. नीरजने फेकलेला पहिलाच भाला हा 88.77 मीटर इतका लांब गेला. आता नीरज वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड मेडलपासून एक पाऊल दूर आहे.
The golden arm Neeraj Chopra🎉 #NeerajChopra 🇮🇳 pic.twitter.com/l0aY3VnvOs
— 𝘚𝘸𝘦𝘵𝘩𝘢™ (@Swetha_little_) August 25, 2023
आता गोल्ड मेडलवर नजर
नीरज चोप्रा याला गेल्या वर्षी गोल्ड मेडल जिंकण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे नीरजला सिलव्हर मेडलवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र आता नीरजकडे सुवर्ण कामगिरी करण्याची संधी आहे. येत्या रविवारी 27 ऑगस्ट रोजी सुवर्ण पदकासाठी सामना होणार आहे. नीरज पात्रता फेरीत ए ग्रुपमध्ये होता. जिथे इतर खेळाडूंना 80 मीटर पर्यंत भालाफेक करणं अवघड होतं तिथे नीरजने आपला झेंडा रोवला. नीरजने थेट 88.77 मीटर लांब भाला फेकला. नीरजच्या या मोसमातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
एकच थ्रो आणि वर्ल्ड रेकॉर्ड
नीरजने भाला फेकला. नीरजने ज्या पद्धतीने भाला फेकला ते उपस्थित सर्वच पाहत राहिले. नीरजने फेकलेला भाला 90 मीटर लांब जाता जाता राहिला. मात्र त्यानंतरही नीरजने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. नीरज 88.77 मीटर लांब भाला फेकत अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचणारा पहिला खेळाडू ठरला.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी क्वालिफाय
दरम्यान नीरजने या थ्रो सह पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी क्वालिफाय केलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होण्यासाठी 85.50 मीटर लांब भाला फेकायचा होता. मात्र नीरजने फेकलेला भाला हा त्यापेक्षा लांब गेला. नीरजने 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीतही धडक मारली आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी क्वालिफाय केलं.