नीरज चोप्राने लपवली मोठी बातमी, डायमंड लीग स्पर्धेचं जेतेपद गमवल्यानंतर केला खुलासा

ब्रसेल्समध्ये पार पडलेल्या डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राचं जेतेपद अवघ्या 1 सेंटीमीटरने हुकलं. त्यामुळे चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. पण त्यानंतर नीरज चोप्राने केलेल्या खुलाशाने पायाखालची वाळू सरकरली आहे. कारण पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर त्याने मोठी बातमी लपवली होती.

नीरज चोप्राने लपवली मोठी बातमी, डायमंड लीग स्पर्धेचं जेतेपद गमवल्यानंतर केला खुलासा
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 6:25 PM

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा सध्या चर्चेत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत त्याचं सुवर्ण पदक हुकलं आणि रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर नीरज चोप्रा डायमंड लीग स्पर्धेसाठी सज्ज झाला होता आणि अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. पण या स्पर्धेतही नीरज चोप्राला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. नीरजने या स्पर्धेत 87.86 मीटर लांब भाला फेकला. पण त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने 87.87 मीटर लांब भाला फेकत जेतेपद मिळवलं. अवघ्या एका सेंटीमीटरने नीरज चोप्राचं जेतेपद हुकलं. पण या स्पर्धेनंतर नीरज चोप्राच्या सोशल मीडियावरील पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यात केलेला खुलासा पाहून चाहत्यांना वाईट वाटलं. कारण नीरज चोप्राला सरावादरम्यान हाताला दुखापत झाली होती. असं असूनही त्याने डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाग घेतला होता.

नीरज चोप्राने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की. ‘2024 हे पर्व संपलं आहे. मी या वर्षभरात शिकलेल्या गोष्टींकडे पाहतो. यात सुधारणा, अपयश, मानसिक आणि खूप काही शिकलो. सोमवारी सराव करताना जखमी झालो होता आणि एक्स-रे समजलं की माझ्या डाव्या हाताच्या हाडामध्ये फ्रॅक्चर आहे. हे माझ्यासाठी वेदनादायी आव्हान होतं. पण आपल्या टीमच्या मदतीने ब्रेसल्समध्ये भाग घेण्यात यशस्वी ठरलो.’

‘या वर्षातील ही शेवटची स्पर्धा होती. मी माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. पण मला या पर्वातून बरंच काही शिकता आलं. आता मी पुन्हा एकदा फिट होऊन पुनरागमनासाठी तयारी करत आहे. प्रोत्साहन देण्यासाठी मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मला 2024 मध्ये एक चांगला एथलीट आणि माणूस बनवलं आहे. 2025 भेटूयात.’, असंही नीरज चोप्राने पुढे सांगितलं. पॅरिस ऑलिम्पिकपासून नीरज ग्रोइन इंजरीने त्रस्त होता. त्यानंतर वैद्यकीय सल्ल्यासाठी जर्मनीत गेला होता. गरज पडल्यास सर्जरी करावी लागेल अशी बातमी समोर आली होती. पण वैद्यकीय सल्ल्यानंतर त्याने डायमंड लीग खेळण्याचा निर्णय घेतला होता.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.