PR Sreejeshकडे मोठी जबाबदारी, निवृत्तीनंतरही टीम इंडियासह राहणार
Hockey India P R Shreejesh: भारताला हॉकीत ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक मिळालं. गोलकीपर पीआर श्रीजेश याने या ऐतिहासिक विजयासह निवृत्त झाला. मात्र त्यानंतर श्रीजेशला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला हॉकीत टोक्योनंतर सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक मिळालं. भारताने हरमनप्रीत सिंह यांच्या नेतृत्वात स्पेनचा 2-1 ने धुव्वा उडवत पदकावर नाव कोरलं. भारताने 54 वर्षांनंतर पुन्हा एकदा सलग दोनदा कांस्य पदक मिळवण्याची कामगिरी केली. भारताने यासह हॉकी टीमची भिंत असणाऱ्या गोलकीपर पीआर श्रीजेश याला विजयी निरोप दिला. पीआर श्रीजेश याचा हा अखेरचा सामना होता. पीआरला विजयानंतर खेळाडूंनी मैदानात अनोखी सलामी दिली. त्यानंतर आता पीआरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पीआरला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
पीआर श्रीजेश हेड कोच
पीआर श्रीजेशला त्याच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पीआरची टीम इंडिया ज्युनिअर हॉकीच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने पीआरला हेड कोच केल्याबाबतची घोषणा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन केली आहे. त्यामुळे आता हॉकी चाहत्यांना पीआर श्रीजेशला पुन्हा एकदा मैदानात पाहता येणार आहे. मात्र आता तो खेळताना नाही, तर कसं खेळायचं हे शिकवताना दिसणार आहे.
श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गोलपोस्टवर निर्णायक भूमिका बजावली. श्रीजेशने प्रतिस्पर्धी संघांचे अनेक गोल रोखले कांस्य पदक मिळवण्यात निर्णायक भूमिका बजावली. श्रीजेशने आधीच पॅरिस ऑलिम्पिक आपली शेवटची स्पर्धा असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच श्रीजेशने सामन्यानंतर आपल्या निर्णयावरुन कोणताही घूमजाव न करण्याचं स्पष्ट केलं. मात्र त्याचं कारण स्पष्ट झालं आहे. श्रीजेश आता हेड कोच म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. हॉकी इंडियाने या सामन्यानंतर सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटलंय हे आपण जाणून घेऊयात.
पीआर श्रीजेशकडे मोठी जबाबदारी
View this post on Instagram
“दिग्गजाने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. पीआर श्रीजेश याची ज्युनिअर हॉकी टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खेळण्यासह ते शिकवण्यापर्यंत तु सर्व युवा खेळाडूंना प्रोत्साहित करत राहशील. तुझ्या कार्यभार स्वीकारण्याची आम्हाला प्रतिक्षा आहे”, असं हॉकी इंडियाने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.