ऑलिम्पिक सुरू होण्याआधीच लाईव्ह टीव्हीवर पाकिस्तानच्या इज्जतीचा कचरा, व्हिडीओ व्हायरल

पॅरिस ऑलिम्पिकचा शुक्रवारी उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये असं काही घडलं की लाईव्ह टीव्हीवर पाकिस्तानच्या इज्जतीचा कचरा झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं?

ऑलिम्पिक सुरू होण्याआधीच लाईव्ह टीव्हीवर पाकिस्तानच्या इज्जतीचा कचरा, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 9:07 PM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू झाली असून आता पदकांची लयलूट करण्यासाठी खेळाडू उत्सुक आहेत. ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी म्हणजेच 26 जुलैला पार पडला. पॅरिस शहरातील सीन नदीवर झालेल्या सोहळ्यामध्ये सहभागी देशांनी बोटीने परेड केली. यावेळी आपले शेजारी पाकिस्तानचीही तुकडी सहभागी झाली होती मात्र असं काही घडलं की पाकिस्तानच्या इज्जतीचा कचरा झालेला पाहायला मिळाला. लाईव्ह टीव्हीवर अँकर असं काय म्हणाला की ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. जाणून घ्या.

पाकिस्तानची परेड सुरु असताना अँकर बोलला की, पाकिस्तान हा 24 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. मात्र ऑलिम्पिकमध्ये फक्त ७ खेळाडू सहभागी होण्यासाठी आले आहेत. पाकिस्तानकडून 18 सदस्यांसह आले आहेत. पण यामध्ये फक्त 7 खेळाडू आहेत. कॉमेंटेटरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ:-

पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानने 32 वर्षे झालीत तरीही काही पदक मिळवता आलेलं नाही. 1992 मध्ये ऑलिम्पिकमध्ये शेवटचे पदक जिंकले होते. बार्सिलोना येथे खेळल्या गेलेल्या 1992 ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या हॉकी संघाने तिसरे स्थान पटकावले आणि कांस्यपदक जिंकलं होतं. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येतरी पदकांचं खातं उघडता येतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.