IND vs NZ Hockey: हॉकी टीम इंडियाची विजयी सलामी, न्यूझीलंडवर 3-2 ने मात

INDIA vs NEW ZEALAND Hockey Match Result, Paris Olympics 2024: टीम इंडियाने रंगतदार झालेल्या सामन्यात न्यूझीलंडवर 3-2 फरकाने विजय मिळवला आहे.

IND vs NZ Hockey: हॉकी टीम इंडियाची विजयी सलामी, न्यूझीलंडवर 3-2 ने मात
hockey india won
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 1:11 AM

हॉकी टीम इंडियाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर 3-2 अशा फरकाने मात करत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने सामन्याच्या सुरुवातीला 0-1 अशा फरकाने पिछाडीवर होती. मात्र त्यानंतरही टीम इंडियाने 3-2 अशा फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाने अशाप्रकारे हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात विजयी सलामी दिली आहे. आता टीम इंडियाचा दुसरा सामना हा अर्जेंटिना विरुद्ध होणार आहे. या सामन्याला 29 जुलैला  भारतीय वेळेनुसार दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

टीम इंडिया 1-2 ने पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर जोरदार कमबॅक करत 7 मिनिटांआधी गोल करत 2-2 ने बरोबरी केली. टीम इंडियाला 57 ते 58 मिनिटा दरम्यान 3 पेनल्टी कॉर्नर आणि 59 व्या मिनिटाला पेन्लटी स्ट्रोक मिळाला. हरमनप्रीतने याचा फायदा घेत गोल केला. त्यामुळे भारतीय चाहते आनंदी झाले. न्यूझीलंडसाठी सॅम लॅन याने (8 व्या मिनिटाला) आणि सायमन चाईल्ड (53) या दोघांनी गोल केले. तर टीम इंडियाकडून मनदीप सिंह (24), विवेक सागर प्रसाद (34) आणि हरमनप्रीत याने (59) व्या मिनिटाला गोल केले.

सायमन चाइल्ड याने पेनल्टी कॉर्नवरुन गोल करत न्यूझीलंडला बरोबरी (2-2) करुन दिली. त्यानंतर आता टीम इंडिया आघाडीसाठी गोलच्या प्रयत्नात होती. टीम इंडियाला आघाडीचा गोल हा कॅप्टनने करुन दिला. हरमनप्रीतने तिसरा गोल ठोकला आणि भारताला विजयी केलं. त्याआधी विवेक सागर याने तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करत टीम इंडियाला 2-1 ने आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडने रेफरेल घेऊन कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काडीमात्र फायदा झाला नाही.

टीम इंडियाची अडखळत सुरुवात झाली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने पिछाडीवर पडल्यानंतर पहिल्या हाफमध्ये गोल करत 1-1 ने बरोबरी साधली. भारतासाठी पहिला गोल हा मनदीप सिंह याने पेनॅल्टीद्वारे केला. मनदीपने 24 व्या मिनिटाला गोल केल्याने टीम इंडियाला बरोबरी करण्यात यश आलं. टीम इंडियाने पहिल्याच पेनाल्टी कॉर्नरचं रुपांतर हे गोलमध्ये केलं. त्याआधी न्यूझीलंडने 8 व्या मिनिटाला गोल केला. सॅम लॅन याने पेनाल्टी कॉर्नरद्वारे गोल केला आणि न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली होती.

हॉकी टीम इंडियाची विजयी सलामी

हॉकी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत सिंग (कर्णधार), हार्दिक सिंग (उपकर्णधार), पीआर श्रीजेश (गोलकीपर), जर्मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, अमित रोहिदास, सुमित, राजकुमार पॉल, मनप्रीत सिंग (मिडफिल्डर), सुखजीत सिंग आणि अभिषेक.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.