ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा गोल्डसाठी लढणार, किती वाजता आहे फायनल? जाणून घ्या

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा दुष्काळ काही संपताना दिसत नाहीये. बुधवारी मीराबाई चानू आणि अविनाश साबळेसुद्धा अपयशी ठरले. मात्र आता सर्व भारतीयांना गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज चोप्राकडून सर्वांना सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. भालाफेक फायनल सामना किती वाजता होणार आहे जाणून घ्या.

ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा गोल्डसाठी लढणार, किती वाजता आहे फायनल? जाणून घ्या
Javelin Thrower Neeraj ChopraImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 7:09 PM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आजचा दिवस भारतासाठी महत्तावाचा आहे. आतापर्यंत भारताला फक्त तीन पदके जिंकता आली आहेत. तिन्ही कांस्य पदके असून अजुनही सुवर्णपदकापासून भारत वंचित आहे. मात्र सर्व देशवासियांना गोल्डन बॉय नीरज चोप्राकडून अपेक्षा फक्त पदकाची नाहीतर सुवर्ण पदकाची आशा आहे. आज रात्री 8 ऑगस्टला भालाफेक फायनल पार पडणार आहे. मागील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरजसमोर पाकिस्ताानच्या अर्शद नदीमचे आव्हान असणार आहे.

देशातलील प्रत्येकाला आता नीरज चोप्राकडून आशा आहेत. ऑलिम्पिक भालाफेकच्या पात्रता फेरीमध्ये नीरज चोप्राने एक नंबरवर राहिला होता. नीरजने पात्रता फेरीमध्ये 89.34 मीटर भाला टाकला होता. हा सर्वाधिक दूर फेकलेला भाला होता. त्यानंतर ग्रेनेडाच्या पीटर अँडरसनने 88.63 मीटर, तिसऱ्या स्थानी जर्मनीच्या वेबर ज्युलियनने 87.76 मीटर, चौथ्या स्थानी पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 86.59 मीटर भाला फेकला.

भालाफेक फायनल रात्री 11.45 ला सुरू होणार आहे. भालाफेकमध्ये एकून 12 खेळाडूंनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फोनवर भालाफेक पाहण्यासाठी जिओ सिनेमावर तुम्ही पाहू शकता. नीरजने स्वत:ला आव्हान दिलं असून त्याने 90 मीटरपेक्षा जास्त दूर भाला फेकायचा आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासह नीरज हा विक्रम मोडतो का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

भारताला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र केल्याने सर्वांनाच धक्का बसला. 50 किली वजन गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये तिने फायनल गाठली होती. मात्र फायनल स्पर्धेआधी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. भारतीयांसाठी हा मोठा धक्का होता. त्यामुळे आज रात्री नीरजकडून करोडो भारतीयांना अपेक्षा आहेत.

Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.