Paris Olympic 2024: भारताला पहिलं मेडल कोण मिळवून देणार? जाणून घ्या 27 जुलैचं पूर्ण वेळापत्रक

ऑलिम्पिक स्पर्धेचा शुभारंभ झाला की पहिल्या दिवसापासून पदकांसाठी चढाओढ सुरु होणार आहे. 27 जुलै हा भारतासाठी महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. या भारताला शूटिंगमधून अपेक्षा असणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष 27 जुलैच्या शूटिंग इव्हेंटकडे असणार आहे.

Paris Olympic 2024: भारताला पहिलं मेडल कोण मिळवून देणार? जाणून घ्या 27 जुलैचं पूर्ण वेळापत्रक
Image Credit source: (Photo: Getty Images)
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 7:35 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडूंकडून फार अपेक्षा आहेत. भारतीय चमूत एकूण 117 खेळाडू असून किती पदकं पदरी पडतात याची उत्सुकता आहे. तसं पाहिलं तर भारताचा ऑलिम्पिक स्पर्धेतील इतिहास काही खास नाही. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने 7 पदकं जिंकली होती. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक पदकं होती. यावरूनच भारताचा ऑलिम्पिक कामगिरीचा अंदाज येतो. आता 27 जुलैपासून भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाला सुरुवात होईल. एकूण सात स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडू उतरतील. या दिवशी बरेचसे खेळाडू पात्रता फेरीत किंवा साखळी फेरीत खेळताना दिसतील. पण शूटिंग इव्हेंटमध्ये भारतीय संघ मेडलसाठी खेळणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी भारतीय संघाचं खातं उघडेल अशी अपेक्षा आहे. सर्वात पहिली स्पर्धा बँडमिंटनची असेल. यात मेन्स डबल्ससाठी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उतरतील. तर महिला डबल्ससाठी अश्विनी पोणप्पा आणि तनीसा क्रेस्टो मैदानात असतील. बॅडमिंटन मेन्स सिंगलसाठी एसएएस प्रणॉय आणि लक्ष्य सेन स्पर्धा करतील. तर महिला सिंगल्ससाठी पीव्ही सिंधु मैदानात असेल. हे सर्व साखळी फेरीतील सामने असून भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता होतील.

बॅडमिंटननंतर रोव्हिंग आणि शूटिंग इव्हेंट सुरु होईल. रोव्हिंग मेन्स स्कल्स हिट्स राउंडमध्ये बलराज पंवर नशिब पणाला लावणार आहे. तर याच वेळी 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड टीम पात्रता फेरीत खेळेल. यात संदीप सिंह, अर्जुन बाबुता, रमिता जिंदल आणि एलावेनिल वालिवरन भाग घेतील. हा इव्हेंट दुपारी 12.30 वाजता होईल. या स्पर्धेत पास झाले तर दुपारी 2 वाजता पदकासाठी लढत होईल. भारताला या इव्हेंटमधून पदक जिंकण्याची पहिली संधी असेल. दुसरीकडे, 10 मीटर एअर पिस्टलच्या पात्रतेसाठी सरबज्योत सिंह आणि अर्जुन चीमा दुपारी 2 वाजता सामना करतील. तर दोन तासांनी 10 मीटर एअर पिस्टल वुमन्स क्वॉलिफिकेशनमध्ये रिदम सांगवान आणि मनु भाकर उतरणार आहेत.

टेनिस स्पर्धेच्या सिंगलसाठी पहिल्या फेरीत सुमित नागल उतरणार आहे. तर डबल्ससाठी रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी टेनिस कोर्टवर उतरतील. हा सामना दुपारी 3 वाजता होईल. दुसरीकडे, टेबल टेनिस सिंगल्ससाठी शरत कमल आणि हरमीत देसाई भाग घेईल. वुमन्स सिंगलमध्ये मनिका बत्रा आणि श्रीजा अकुला असतील. हे सामने संध्याकाळी 6.30 वाजता होतील. त्यानंतर 7 वाजता वुमन्स बॉक्सिंग 54 किलो वजनी गटात प्रीति पवार भाग घेईल. तसेच रात्री 9 वाजता मेन्स हॉकी संघाचा सामना न्यूझीलंडशी होईल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.