म्हारी छोरियां छोरों से कम हैं के..! विनेश फोगाटची कुस्तीमध्ये कमाल, भारताचं चौथं पदक झालं पक्कं

ऑलिम्पिक स्पर्धेचा 11 वा दिवस सुरु आहे. या दिवसाच्या शेवटी भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. कुस्तीमध्ये विनेश फोगाटने भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस लोपेजला धोबीपछाड दिला.

म्हारी छोरियां छोरों से कम हैं के..! विनेश फोगाटची कुस्तीमध्ये कमाल, भारताचं चौथं पदक झालं पक्कं
विनेशने सेमीफायनलमध्ये तीन तीन कुस्तीपटूंना पराभूत केलं होतं. त्यानंतर तिला फायनलमध्ये स्थान मिळालं. फायनलमध्ये ती सुवर्णपदकाची लयलूट करेल असं सर्वांनाच वाटत होतं. पण अपात्र घोषित झाल्याने तिचं आणि देशवासियांचं सुवर्णपदकाचं स्वप्न धुळीला मिळालं आहे.
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 11:10 PM

ऑलिम्पिक स्पर्धेचा 11 वा दिवस भारतासाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी घेऊन आला आहे. भारताची पदकाची गाडी तीनवरच अडकली होती. आता भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. कुस्तीपटू विनेश फोगाटने अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे.  50 किलो वजनी गटात विनेशने ही कामगिरी केली आहे . यामुळे भारताच्या पारड्यात आणखी एक पदक पडणार हे निश्चित झालं आहे. विनेश फोगाटने उपांत्य सामन्यात क्युबाच्या युस्नेलिस लोपेजला लोळवलं आणि अंतिम फेरी गाठली आहे. यासह विनेश फोगाटने इतिहासाची नोंद केली आहे. विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आता मात्र भारताला विनेशकडून सुवर्ण पदकाची आशा असणार आहे. भारतासाठी साक्षी मलिक हीने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं.

विनेशने क्युबाच्या लोपेजला 5-0 अशी मात दिली. या सामन्यातील पहिली फेरी खुपच अतितटीची झाली. त्यामुळे कोण आघाडी घेणार अशी स्थिती होती. अखेर विनेशने 1-0 ने आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत विनेशने 2-2 गुणांची आघाडी घेत 5-0 अशी स्थिती आणली. या स्थितीत क्युबाच्या कुस्तीपटूला कमबॅक करता आलं नाही. विनेशने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. विनेश ऑलिम्पिकमध्ये कुस्तीची अंतिम फेरी गाठणारी देशातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली.

विनेशला सुवर्ण की रजत पदक मिळणार याचा निर्णय 7 ऑगस्टला होणार आहे. विनेश फोगाटने 2016 रियो डि जेनेरो ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं होत. तेव्हा दुखापत झाल्याने स्पर्धेबाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपूर्वीच मात खावी लागली होती. पण यावेळेस उपांत्य फेरी गाठत अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.

विनेशने अंतिम 16 सामन्यात मोठा उलटफेर केला होता. जागतिक क्रमवारीत एक नंबर असलेल्या युई सुसाकी हिला 3-2 ने मात दिली होती. तेव्हाच फोगाट या स्पर्धेत कमाल करणार हे निश्चित झालं होतं. युईने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं होतं. त्यानंतर विनेशने युक्रेनच्या लिवाचचा 7-5 अशा फरकाने धुव्वा उडवत सेमी फायलनचं तिकीट मिळवलं होतं.

पाच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं कुस्तीत हे सातवं मेडल आहे. यापूर्वी 2008 मध्ये सुशील कुमारने कांस्य, 2012 सुशील कुमारने रजत आणि योगेश्वर दत्तने कांस्य पदक मिळवलं होतं. 2016 मध्ये साक्षी मलिकने कांस्य, 2020 मध्ये बजरंग पुनियाने कांस्य आणि रवि दहियाने रजत पदक मिळवलं होतं.

युगेंद्र पवार बारामती विधानसभा लढविणार?दादांनी दिलेले संकेत खरे ठरणार?
युगेंद्र पवार बारामती विधानसभा लढविणार?दादांनी दिलेले संकेत खरे ठरणार?.
वडेट्टीवारांच्या 'त्या' आरोपांवर भुजबळांची अप्रत्यक्ष कबुली, म्हणाले..
वडेट्टीवारांच्या 'त्या' आरोपांवर भुजबळांची अप्रत्यक्ष कबुली, म्हणाले...
राज्यात भाजपचं मिशन 125, शाहांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची खलबतं सुरू
राज्यात भाजपचं मिशन 125, शाहांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची खलबतं सुरू.
बावनकुळेंसाठी कायदा वेगळा? नागपुरातील अपघातावरून अंधारेंचा हल्लाबोल
बावनकुळेंसाठी कायदा वेगळा? नागपुरातील अपघातावरून अंधारेंचा हल्लाबोल.
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात दादा का नव्हते? अमोल मिटकरींनी दिलं उत्तर
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात दादा का नव्हते? अमोल मिटकरींनी दिलं उत्तर.
Amazon : 'ॲमेझॉन'वरून काही ऑर्डर करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा!
Amazon : 'ॲमेझॉन'वरून काही ऑर्डर करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा!.
बाळाला ट्रेनच्या शौचालयात टाकले अन्... एक्सप्रेसमधील धक्कादायक घटना
बाळाला ट्रेनच्या शौचालयात टाकले अन्... एक्सप्रेसमधील धक्कादायक घटना.
कृषिमंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात, कोणी केली टीका?
कृषिमंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात, कोणी केली टीका?.
'राऊतांची औकात नाही, मानहानीचा दावा करणार'; कोणी केला हल्लाबोल?
'राऊतांची औकात नाही, मानहानीचा दावा करणार'; कोणी केला हल्लाबोल?.
अमित शाहांनी आपल्या पत्नीसह घेतले लालबागच्या राज्याचे आशीर्वाद
अमित शाहांनी आपल्या पत्नीसह घेतले लालबागच्या राज्याचे आशीर्वाद.